July 24, 2025 1:15 PM

views 32

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ब्रिटनचे प्रधानमंत्री केयर स्टार्मर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ब्रिटनचे प्रधानमंत्री केयर स्टार्मर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.  या भेटीदरम्यान भारत आणि इंग्लंड धोरणात्मक संबंधांना नवी गती देण्यावर चर्चा होणार आहे. ब्रिटनबरोबर  मुक्त व्यापार कराराला  औपचारिक रुप देण्यात येईल.   प्रधानमंत्री मोदी काल दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी लंडनला पोहोचले तेव्हा रंगीबेरंगी पोषाखातल्या  भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात लंडनमधल्या भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल आभार व्यक्त ...

July 23, 2025 2:30 PM

views 31

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्रिटन आणि मालदीव दौऱ्यावर रवाना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर रवाना झाले. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत; तसंच ब्रिटनचे राजे चार्ल्स यांचीही ते भेट घेतील, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी काल नवी दिल्लीत बातमीदारांना सांगितलं. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी मालदीवच्या दौऱ्यावर जाणार आहेत. २६ जुलैला मालदीवच्या ६०व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून त...

July 23, 2025 9:33 AM

views 37

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्यासमवेत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत; तसंच ब्रिटनचे राजे चार्ल्स यांचीही ते भेट घेतील, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी काल नवी दिल्लीत बातमीदारांना सांगितलं.   दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी मालदीवच्या दौऱ्यावर जाणार आहेत. २६ जुलैला मालदीवच्या ६०व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहु...

July 22, 2025 8:24 PM

views 34

प्रधानमंत्री उद्यापासून ब्रिटन आणि मालदीव दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर जात आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील तसंच ब्रिटनचे राजे चार्ल्स यांची भेट घेतील. दोन्ही देशांच्या दौऱ्यात प्रधानमंत्री विविध उद्योगांच्या प्रतिनिधींशी चर्चा करतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं. भारत आणि ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांच्या भेटीत प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा होईल, परस्परांसो...

July 20, 2025 7:48 PM

views 69

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २५ जुलैपासून दोन दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २५ जुलैपासून दोन दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीदरम्यान ते मालदीवमधल्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन करतील. या भेटीत प्रधानमंत्री आणि मालदीवचे राष्ट्रपती मुइझ्झू  यांच्यात महत्त्वाच्या द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर उच्चस्तरीय चर्चा होईल. त्यानंतर अनेक संयुक्त प्रकल्पांचं उद्घाटन केलं जाईल. याशिवाय दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य वाढवण्याच्या उद्देशानं अनेक सामंजस्य करारही केले जाणार आहेत.

July 20, 2025 7:30 PM

views 29

मेघालयात घडून आलेल्या परिवर्तनाबद्दल प्रधानमंत्र्यांचा लेख

पर्यटन, युवा सक्षमीकरण, महिलांचे स्वयंसहाय्य्यता गट, पीएम सूर्यघर योजना आणि व्हायब्रण्ट व्हिलेज योजना या सारख्या उपक्रमांमुळे मेघालयात घडून आलेल्या परिवर्तनाबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनी एक लेख समाजमाध्यमावर सामायिक केला आहे. शासकीय मदत आणि स्थानिक जनतेच्या सहभागामुळे मेघालय आपल्या उदाहरणातून सक्षम आणि आत्मनिर्भर भारताचा मार्ग दाखवत आहे असं मोदी यांनी समाजमाध्यमांवर म्हटलं आहे.

July 19, 2025 10:07 AM

views 40

पोलाद उद्योगाची भूमी असलेल्या पश्चिम बंगालचा प्रधानमंत्र्यांद्वारे गौरव

पश्चिम बंगालच्या भूमीनं अनेक महत्त्वाच्या व्यक्ती देशाला दिल्या आहेत, ही भूमी प्रेरणादायी आहे. पोलाद उद्योगाची भूमी असलेला हा भूभाग एकेकाळी रोजगार निर्मितीचे केंद्र होतं अशा शब्दांत प्रधानमंत्र्यांनी पश्चिम बंगालचा गौरव केला. पश्चिम बंगालमध्ये काल तेल, वायू, रेल्वे आणि रस्ते या क्षेत्रामधील पाच हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी उपस्थित जनसमुदायाला ते संबोधित करत होते.   राज्यातून तरूण रोजगाराच्या शोधार्...

July 18, 2025 2:05 PM

views 42

पूर्व भारताच्या विकासाकरता बिहारचा विकास अत्यंत गरजेचा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

देशातली पूर्वेकडची राज्यं प्रगतीपथावर असून पूर्व भारताच्या विकासासाठी बिहारचा विकास अत्यंत गरजेचा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. बिहारमध्ये मोतिहारी इथं सात हजार २०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे, रस्ते, ग्रामीण विकास, मत्स्य व्यवसाय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे.    २१व्या शतकात जग वेगाने पुढे जातंय. ज्या प्रमाण...

July 12, 2025 12:54 PM

views 66

‘रोजगार मेळावा’ हा सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतिबिंब – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

विकसित भारतासाठी तरुणांना सक्षम तसंच विकासाचं माध्यम बनवण्यासाठी रोजगार मेळावा हा सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशभरात ४७ ठिकाणी आयोजित १६व्या रोजगार मेळाव्याला त्यांनी आज संबोधित केलं.  यावेळी त्यांनी दूरदृश्यप्रणाली द्वारे विविध सरकारी विभागांत नव्यानं नियुक्त झालेल्या युवकांना ५१ हजारांहून अधिक नियुक्ती पत्रांचं वितरण केलं. नवीन भरती झालेल्या युवकांचं त्यांनी अभिनंदन केलं. सरकारच्या रोजगार मेळावा या उपक्रमामुळे लाखो तरुणांना केंद्र सरकार...

July 12, 2025 3:38 PM

views 32

देशभरातल्या ४७ ठिकाणी रोजगार मेळाव्यांमधून ५१ हजाराहून जास्त नियुक्तीपत्रांचं वाटप

विकसित भारतासाठी तरुणांना सक्षम तसंच विकासाचं माध्यम बनवण्यासाठी रोजगार मेळावा हा सरकारच्या वचनबद्धचतेचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोेदी यांनी म्हटलं आहे. देशभरात ४७ ठिकाणी आयोजित १६व्या रोजगार मेळाव्याला त्यांनी आज संबोधित केलं. यावेळी त्यांनी दूरदृश्यप्रणाली द्वारे विविध सरकारी विभागांत नव्यानं नियुक्त झालेल्या युवकांना ५१ हजारांहून अधिक नियुक्ती पत्रांचं वितरण केलं. देशात विकसित होत असलेल्या स्टार्टअप्स, नवोन्मेष आणि संशोधन या क्षेत्रांमध्ये वाढ होत असल्यामुळे देशातल्या तरुणांच्...