August 25, 2024 2:12 PM

views 29

लखपती दीदी मेळाव्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जळगावात आगमन

लखपती दीदी मेळाव्यात भाग घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज छत्रपती संभाजीनगर मार्गे जळगावात आगमन झालं. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, पालकमंत्री अब्दुल सत्तार, यांच्यासह स्थानिक खासदार- आमदार, तसंच जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं.    जळगाव विमानतळावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मदत, पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव सुजात...

August 24, 2024 1:59 PM

views 31

युक्रेन शांतिपरिषदेची दुसरी फेरी भारतात घेण्याचा वोलोदिमीर झेलेन्सकी यांचा प्रस्ताव

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दौरा युक्रेन रशिया संघर्षावर तोडगा काढण्यात सहाय्यभूत ठरेल, असं अमेरिकेनं म्हटलं आहे. हा संघर्ष थांबवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही देशाचं स्वागत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन किर्बी यांनी म्हटलं आहे.

August 23, 2024 12:59 PM

views 72

प्रधानमंत्र्यांच्या युक्रेन भेटीमुळे रशिया-युक्रेन संघर्ष संपण्यास मदत होईल – संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या युक्रेन भेटीमुळे रशिया युक्रेन संघर्ष संपण्यास मदत होईल, अशी आशा संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी व्यक्त केली आहे. त्यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी म्हटलं आहे. अनेक देशांच्या प्रमुखांच्या भेटींसह सर्वसाधारण सभेचे ठराव, आंतरराष्ट्रीय कायदा आणि प्रादेशिक एकात्मतेसाठीचे प्रयत्न यामुळे हा संघर्ष थांबवण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा आहे. रशियानं लष्करी कारवाई थांबवावी अशी मागणी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं किमान तीन ठरावांमध्ये केली आहे, तर एका ठरावात युक्रेनच...

August 23, 2024 1:46 PM

views 41

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २५ ऑगस्टला ‘मन की बात’ कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११३ वा भाग असेल.

August 22, 2024 8:05 PM

views 37

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पोलंड दौऱ्यात, दोन्ही देशांमधले संबंध धोरणात्मक भागिदारीत परिवर्तित करण्याचा निर्णय

भारत आणि पोलंडनं परस्परांबरोबरचे संबंध धोरणात्मक भागीदारीत परिवर्तित करण्याचा निर्णय घेतल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. वॉर्सा इथं  पोलंडचे प्रधानमंत्री डोनाल्ड टस्क यांच्या बरोबर झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हे निवेदन जारी केलं. दोन्ही देशांमधल्या राजनैतिक संबंधांचं यंदा ७० वं वर्ष असून, भारत-पोलंड संबंध लोकशाही आणि कायद्याचं राज्य यासारख्या सामायिक मूल्यांवर आधारित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्य...

August 21, 2024 7:01 PM

views 45

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या पोलंड दौऱ्यासाठी वारसॉ इथं दाखल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या पोलंड दौऱ्यासाठी राजधानी वारसॉ इथं दाखल झाले. वारसॉ इथल्या लष्कराच्या विमानतळावर प्रधानमंत्री मोद यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. पोलंड आणि भारतातल्या जामनगर आणि कोल्हापूर यांच्यातले ऋणानुबंध जपणाऱ्या दोन स्मृति स्थळांना प्रधानमंत्री भेट देणार आहेत. त्यानंतर वारसॉ इथंल्या कार्यक्रमात प्रधानमंत्री सहभागी होतील आणि भारतीय वंशांच्या नागरिकांशी ही ते संवाद साधणार आहेत. पोलंड आणि भारताच्या राजनैतिक संबंधांना ७० वर्षे पूर्ण होत हा दौरा महत्त्वाचा असल्याचं प्...

August 21, 2024 1:01 PM

views 36

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसाच्या पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवस पोलंड आणि युक्रेन च्या दौऱ्यावर जात आहेत . पोलंडची राजधानी वाॅर्सा  इथं त्यांच स्वागत करण्यात  येणार आहे. पोलंड चे  प्रधानमंत्री  डोनाल्‍ड टस्‍क आणि राष्‍ट्रपती  आंद्रेज डूडा  यांची भेट घेऊन ते चर्चा करणार आहेत. तसंच पोलंड मधल्या भारतीयांशी  तसच व्यापारी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. 45 वर्षांनंतर भारताचे प्रधानमंत्री प्रथमच पोलंड भेट देत असून दोन्ही देशाच्या धोरणात्मक द्विपक्षीय संबंधाना यंदा 70 वर्ष पूर्ण होत आहेत. पोलंड आणि भारतातील जामनगर आ...

August 20, 2024 1:16 PM

views 39

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून पोलंड आणि युक्रेनच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून पोलंड आणि युक्रेनच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असतील. नवी दिल्लीत काल झालेल्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव तन्मय लाल यांनी ही माहिती दिली. ४५ वर्षांनंतर भारतीय प्रधानमंत्री पोलंडला भेट देणार असल्यानं हा दौरा महत्त्वाचा असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. प्रधानमंत्री मोदी पोलंडचे प्रधानमंत्री डोनाल्ड टस्क यांच्याशी संवाद साधतील, तसंच राष्ट्राध्यक्ष आंद्रे डुडा यांच्याशीही चर्चा करतील. त्यानंतर ते वॉर्सा भागातल्या भारतीयांची भेट घेतील. २३ ऑगस्टल...

August 20, 2024 9:15 AM

views 67

पॅरीस पॅरालिम्पिक्समध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंशी प्रधानमंत्र्यांनी साधला संवाद

पॅरीस पॅरालिम्पिक्समध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संवाद साधला. हा प्रवास या खेळाडूंसह भारतासाठीही खूप महत्त्वाचा असल्याची भावना पंतप्रधानांनी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून खेळाडूंशी बोलताना व्यक्त केली. तसंच 140 कोटी भारतीयांचे आशिर्वाद तुमच्यासोबत आहेत, असं सांगत त्यांना शुभेच्छाही दिल्या. पॅरालिम्पिक्ससाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर खेळाडू पाठविण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. 84 खेळाडू पॅरीस पॅरालिम्पिक्समध्ये भारत...

August 17, 2024 8:24 PM

views 47

जागतिक आव्हानांचा सामना विकसनशील देशांनी एकजुटीनं करावा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

अनिश्चितता, भूराजकीय युद्ध, रोगराई अशा जागतिक आव्हानांचा सामना विकसनशील देशांनी एकजुटीनं करावा, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ संघटनेच्या शिखर बैठकीत ते बोलत होते. दूरस्थ पद्धतीनं ही बैठक झाली. वातावरण बदल, आरोग्य, खाद्य आणि ऊर्जा सुरक्षेचा सामना या देशांना करावा लागतो आहे. दहशतवाद, कट्टरतावाद आणि फुटीरतावाद हे देखील समाजाला धोकादायक असल्याचं ते म्हणाले.  व्यापार आणि दळणवळणाला प्रोत्साहन, शाश्वत विकास उद्दिष्ट आणि महिलांचा; ‘विकास प्रक्रीयेत’ वाढता सहभाग या...