October 3, 2024 1:27 PM

views 30

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या ई-लिलावाच्या तारखेत वाढ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देश विदेशात भेट स्वरूपात मिळालेल्या वस्तूंच्या  इ-लिलावाची तारीख आता ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. पूर्वी हा लिलाव १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत होणार होता. प्रधानमंत्र्यांना मिळालेल्या भेट वस्तूंच्या लिलावाची ही ६वी आवृत्ती असून यातून मिळणारं धन नमामि गंगे प्रकल्पासाठी  वापरलं जाणार असल्यामुळे नागरिकांनी मोठया संख्येनं लिलावात बोली लावून या कार्यात योगदान द्यावं, असं आवाहन सरकारनं केलं आहे. उत्कृष्ट कलाकृती, मंदिरांच्या प्रतिकृती, हिंदू देवतांच्या मू...

October 1, 2024 8:07 PM

views 35

काँग्रेस जाती-पातीचं राजकारण करत असल्याची प्रधानमंत्र्यांची टीका

काँग्रेस जाती-पातीचं राजकारण करत असल्याची टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ते आज हरयाणात पलवल इथं निवडणूक प्रचारसभेत बोलत होते. काँग्रेसनं ७० वर्ष सत्तेत असूनही जनतेला रस्ते, वीज, पाणी, शौचालयं, घरं अशा मुलभूत सुविधांपासून वंचित ठेवलं, जम्मू-कश्मीरमधे देशाची राज्यघटना राबवण्यात अडथळे निर्माण केले, ३७० कलम रद्द करायला आणि महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीला विरोध केला, अशी टीकाही त्यांनी केली. भाजपानं देशापुढचे प्रश्न पूर्णपणे गांभीर्यानं सोडवले, असं मोदी म्हणाले.   ...

September 29, 2024 1:26 PM

views 51

‘मेक इन इंडिया’ अभियानामुुळे भारत जगातलं महत्त्वाचं उत्पादन केंद्र बनला असल्याचं प्रधानमंत्र्यांचं ‘मन की बात’मध्ये प्रतिपादन

केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया या महत्वाच्या अभियानाला दहा वर्ष पूर्ण होत असल्याचं स्मरणही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात मध्ये केलं. या अभियानानं गरीब, मध्यमवर्ग तसंच सूक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा लाभ झाला. या अभियानानं प्रत्येक घटकाला आपली प्रतिभा जगासमोर आणायची संधी दिली असं ते म्हणाले. या अभियानामुळे आज भारत उत्पादनाचं केंद्र बनला आहे, प्रत्येक क्षेत्रातली निर्यात वाढली आहे आहे असं त्यांनी सांगितलं. परकीय गुंतवणुकीचं वाढतं प्रमाण हे या अभियानाची यशोगाथा सांगतं असं ते म्ह...

September 29, 2024 3:38 PM

views 49

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रातल्या ११ हजार २४० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण

महाराष्ट्रातल्या ११ हजार २४० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. पुण्यातल्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मेट्रो सेवेचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झालं. त्याचबरोबर २ हजार ९५५ कोटी रुपये खर्चाच्या पुणे मेट्रो स्वारगेट- कात्रज विस्ताराची पायाभरणीही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली. पुण्यातल्या भिडेवाडा इथल्या सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मारकाचं भूमिपूजनही मोदी यांनी केलं....

September 26, 2024 7:40 PM

views 35

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून ३ परमरुद्र संगणकांचं लोकार्पण

संशोधनातून स्वावलंबन हाच आजचा आपला मंत्र बनला आहे. विज्ञानाचं महत्त्व केवळ शोध आणि विकासातच नाही तर प्रत्येकाच्या आशा-आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. हवामान आणि वातावरण बदलासाठीची उच्च क्षमता कम्प्युटिंग यंत्रणा असलेल्या पुणे इथल्या तीन परम रुद्र सुपर कॉम्प्युटिंग प्रणाली तसंच, उच्च कार्यक्षमतेच्या संगणकीय प्रणालीचं उद्घाटन त्यांनी दूरदृश्य पद्धतीनं केलं, त्यावेळी ते बोलत होते. भारत संगणकीय क्षेत्र तसंच विज्ञान-तंत्रज्ञानात स्वावलंबी होण्य...

September 24, 2024 11:00 AM

views 67

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारचा महिला सक्षमीकरणावर भर

तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं पहिले 100 दिवस पूर्ण केले आहेत. या काळात, सरकारनं पायाभूत सुविधा, समाजकल्याण, शेतकरी, मध्यमवर्ग, महिला आणि तरुणांवर लक्ष केंद्रित करून 15 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले आहेत. यांमध्ये विशेषत: ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या उद्देशानं अनेक उपक्रमांसह महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा भक्कम पाया सरकारनं घातला आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत 90 ल...

September 24, 2024 9:56 AM

views 39

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलीनस्की यांच्याशी स्वतंत्र बैठक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेतल्या शिखर परिषदे नंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलीनस्की यांच्याशी स्वतंत्र बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी आर्मेनिया चे पंतप्रधान निकोल पशिन्यान आणि वॅटिकन होली सी चे परराष्ट्र मंत्री कार्डिनल पियेत्रो पेरोलीन यांच्या बरोबरही चर्चा केली. त्यानंतर प्रधानमंत्री मोदी यांची विएतनामचे राष्ट्रपती टो लैम यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकही झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये परस्पर सहयोग वाढवण्या विषयी चर्चा झाली.   [video width="1280" height="...

September 24, 2024 9:50 AM

views 28

भारत आपल्या डिजिटल पायाभूत सुविधांचा आराखडा जगासमोर मांडायला तयार – प्रधानमंत्री

डिजिटल पायाभूत सुविधा अडथळा न होता दोन देशांना जोडणारा सेतू बनवणार असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत समिट ऑफ द फ्यूचर या शिखर परिषदेमध्ये बोलत होते. लोकहितासाठी भारत आपल्या डिजिटल पायाभूत सुविधांचा आराखडा जगासमोर मांडायला तयार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. सुरक्षित तंत्रज्ञान आणि जबाबदारीनं त्याचा वापर करण्यासाठी नियमांची गरज असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. मानवी जीवनाची सफलता युद्धात नसून सामूहिक शक्तिमध्ये असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं...

September 24, 2024 8:55 AM

views 65

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २६ सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २६ सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत; त्यांच्या नियोजित दौऱ्याच्या पूर्वतयारीचा आढावा उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काल मुंबईत मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला. या दौऱ्याच्या अनुषंगाने, सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय आणि सहकार्याने काम करावं; असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

September 23, 2024 6:47 PM

views 38

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कुवेतचे राजपुत्र शेख सबाह अल-खालिद अल-सबाह यांच्याशी द्विपक्षीय चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी   न्यूयॉर्कमधे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ७९ व्या सत्रादरम्यान नेपाळचे प्रधानमंत्री के पी शर्मा ओली, कुवेतचे राजपुत्र शेख सबाह खालेद अल हम अल सबाह आणि पॅलेस्टिनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्याशी स्वतंत्रपणे विविध विषयांवर चर्चा केली.   मोदी आणि ओली यांनी भारत आणि नेपाळ यांच्यातल्या दृढ संबंधांचा आढावा घेतला आणि विकास भागीदारी, जलऊर्जा सहकार्य, जनसंपर्क अशा अनेक क्षेत्रातल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं.  ...