January 28, 2025 1:52 PM

views 12

विकासदर वाढवण्यासाठी देशातल्या संपूर्ण औद्योगिक परिसंस्थेत सुधारणा करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

केवळ कच्च्या मालाची निर्यात करून विकासाचा वेग वाढणं शक्य नसून विकासदर वाढवण्यासाठी संपूर्ण औद्योगिक परिसंस्थेत सुधारणा करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. भुवनेश्वर इथे उत्कर्ष ओदिशा- मेक इन ओदिशा कॉनक्लेव्हच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संशोधन आणि नवोन्मेषासाठी एक सशक्त परिसंस्था निर्माण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा मोदी यांनी पुनरुच्चार केला आणि उद्योगांना या प्रयत्नात सरकारसोबत सहकार्य करण्याचं आवाहनही केलं.    उत्कर्ष ओदिशा ही ओदिशा सरकारतर्फे आयोजित केलेली एक...

January 27, 2025 8:12 PM

views 30

‘एक राष्ट्र एक निव़डणूक’ या संकल्पनेवर देशभरात चर्चा घडवून आणण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

देशात अनेक वेळा निवडणुका होत असल्यामुळे कामाचा वेग मंदावतो, त्यामुळे ‘एक राष्ट्र एक निव़डणूक’ या संकल्पनेवर देशभरात चर्चा घडवून आणण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तरुणांना केलं. नवी दिल्लीतल्या परेड मैदानावर आयोजित राष्ट्रीय छात्र सेनेच्या रॅलीला ते संबोधित करत होते. ‘युवा शक्ती, विकसित भारत’ अशी यंदाच्या रॅलीची संकल्पना होती. देशाच्या विकासात छात्रांच्या योगदानाचं यावेळी प्रधानमंत्र्यांनी कौतुक केलं.   गेल्या दहा वर्षांत देशातल्या तरुणांनी ५० हजारांहून अधिक स्टार्टअप सुरू केले ...

January 27, 2025 1:32 PM

views 34

७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशोदेशीच्या नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल प्रधानमंत्र्यांनी मानले आभार

देशाच्या ७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जागतिक नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आभार व्यक्त केले आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. ही घटना दोन्ही देशांमधलं धोरणात्मक सहकार्य आणि दीर्घ मैत्रीचं प्रतीक होतं, असं मोदी यांनी मॅक्रॉन यांच्या समाजमाध्यमावरच्या पोस्टला उत्तर देताना म्हटलं आहे. आयर्लंडचे प्रधानमंत्री मायकल मार्टिन यांनी समाजमाध्यमावर दिलेल्या शुभेच्छा संदेशालाही प्रधानमंत्र्यांनी उत्तर ...

January 22, 2025 8:13 PM

views 45

आम आदमी पक्ष दैनंदिन गरजांची पूर्ती करण्यात अपयशी – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

आम आदमी पक्ष दैनंदिन गरजांची पूर्ती करण्यात अपयशी ठरला असून दिल्लीत मद्य उपलब्ध आहे पण पिण्यासाठी पाणी नाही. अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्ताधारी आम आदमी पार्टीवर हल्लाबोल केला आहे. ते आज भाजपाच्या बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांबरोबर नमो एप वरुन संवाद साधताना बोलत होते. आप आणि काँग्रेस लोकांची दिशाभूल करत असून केजरीवाल यांनी त्यांच्या घरावर मोठा खर्च केला, मात्र आयुष्यमान योजना स्विकारली नाही. याकडे लक्ष वेधतानाच त्यांनी यमुना नदीचं प्रदूषण दूर करण्याचं आश्वासन आप ने दिलं पण ते पूर्...

January 19, 2025 7:53 PM

views 42

एनडीआरएफच्या स्थापना दिनानिमित्त प्रधानमंत्र्याचा शूर जवानांच्या कामगिरीला सलाम

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या स्थापना दिनी या दलातल्या शूर जवानांच्या कामगिरीला सलाम केला आहे. प्रधानमंत्र्यांनी या जवानांच्या धैर्य, समर्पण आणि निस्वार्थ सेवेचं  समाज मध्यमावरच्या संदेशाद्वारे कौतुक केलं आहे. आपत्ती काळात सुरक्षेची खात्री करणं, लोकांचे जीव वाचवणं यासाठी या दलाची अतूट वचनबद्धता प्रशंसनीय आहे, असंही ते म्हणाले. आपत्ती प्रतिसाद आणि व्यवस्थापनात एनडीआरएफ नं जागतिक मानक स्थापन केल्याचं त्यांनी सांगितलं.

January 19, 2025 7:14 PM

views 43

संविधान सभेच्या चर्चेचा गौरवशाली वारसा, भारत घडवण्यासाठी प्रधानमंत्र्यांचं ‘मन की बात’ मधून आवाहन

संविधान सभेत झालेल्या चर्चा, सदस्यांनी मांडलेले विचार, हा आपला सर्वात मोठा वारसा असून संविधान निर्मात्यांना अभिमान वाटावा, असा भारत घडवण्यासाठी कार्यरत राहिलं पाहिजे, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमातून केलं.   भारताच्या प्रजासत्ताकाचा ७५ वा वर्धापन दिन, तसंच भारतीय संविधान लागू झाल्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्यानिमीत्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी संविधान सभेत मांडलेल्या विचारांचं ध्वनिमुद्रण प्रधानमंत्र्यांनी...

January 18, 2025 1:45 PM

views 28

प्रधानमंत्री उद्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवाशीयांशी साधणार संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशविदेशात राहणाऱ्या भारतीयांसमोर आपले विचार मांडणार आहेत. हा या कार्यक्रमाचा एकशे अठरावा (११८) भाग आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या तसंच ए आय आर चे संकेतस्थळ आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप वरून प्रसारित केला जाणार आहे. त्याशिवाय हा कार्यक्रम एआयआर न्यूज, डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यलय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब वाहिनीवरून थेट प्रसारित केला जाणार आहे.

January 17, 2025 1:30 PM

views 29

विकसित भारताची वाटचाल ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या प्रगतीचीही वाटचाल ठरणार- प्रधानमंत्री

विकसित भारताची वाटचाल ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या प्रगतीचीही वाटचाल ठरणार आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारत ग्लोबल मोबिलिटी एक्स्पोच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आजचा भारत हा भावनांनी, युवा उर्जेनं परिपूर्ण आहे. त्याचे पडसाद भारताच्या ऑटोमोटिव्ह क्षेत्रात पाहायला मिळत आहेत. गेल्या वर्षी भारताचं ऑटो क्षेत्र जवळपास १२ टक्क्यानं वाढलं आहे.   मेक इन इंडिया अंतर्गत तयार होणाऱ्या गाड्यांची निर्यातही वाढली आहे, असं मोदी यावेळी म्हणाले. ...

January 15, 2025 7:05 PM

views 35

अध्यात्म हा आपल्या संस्कृतीचा गाभा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी मुंबईतल्या खारघर इथं इस्कॉनच्या श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज झालं. अध्यात्म हा आपल्या संस्कृतीचा गाभा आहे. भारत समजून घेण्यासाठी आधी हे अध्यात्म आपल्या आत रुजवायला हवं, असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. मानवतेची सेवा हे या अध्यात्मिक संस्कृतीचं मूळ आहे आणि याच धारणेतून केंद्र सरकारनं आयुष्मान भारत, हर घर जल, उज्ज्वला योजना इत्यादी कार्यक्रम राबवले आहेत, असं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं.

January 14, 2025 5:43 PM

views 49

परिक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी यावर्षी विक्रमी नोंदणी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी यावर्षी विक्रमी नोंदणी झाली आहे.  यामध्ये परदेशी विद्यार्थ्यांचं प्रमाणही लक्षणीय आहे, अशी माहिती  केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिली आहे.  या कार्यक्रमासाठीच्या नोंदणीला 14 डिसेंबर 2024 ला सुरुवात झाली असून, आज शेवटचा दिवस आहे.  कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी  mygov.in वर लवकरात लवकर नोंदणी करण्याचं आवाहन मंत्रालयाने केलं आहे.  या उपक्रमाचं हे आठवं सत्र असून परिक्षा म्हणजे  शिक्षणाचा उत्सव असल्याची भावना लोकांमध्ये जागत असल्याचं ...