June 6, 2025 8:21 PM

views 46

काश्मिर ते कन्याकुमारी रेल्वेमार्गानं जोडणाऱ्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्पाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

देश आता काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत रेल्वे मार्गाने जोडला गेला असून चिनाब आणि अंजी हे पूल जम्मू-काश्मीरसाठी समृद्धीचं प्रवेशद्वार होतील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. ते आज जम्मू आणि कश्मीरमध्ये ४६ हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध पायाभूत प्रकल्पांच्या उद्घाटनावेळी बोलत होते. यावेळी त्यांनी उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्पाचं राष्ट्रार्पणही केलं. या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आणि जगातला सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब पुलाचं उद्घाटन केलं.   तसंच, देशातला सर्वात उंचाव...

June 6, 2025 10:03 AM

views 42

प्रधानमंत्री आज जम्मू आणि काश्मीरला भेट देणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते ४६ हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. यामध्ये उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्प प्रधानमंत्री राष्ट्राला समर्पित करतील. या प्रकल्पाअंतर्गत असलेला चिनाब पूल हा देशातला पहिला केबल-स्टेड अर्थात रज्जु रेल्वे पूल आहे. 272 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे-जोड प्रकल्प 44 हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. हा पूर्णपणे विद्युत रेल्वे प्रकल्प असून त्यात 36 बोगदे आणि 943 पूल आहेत....

June 5, 2025 2:28 PM

views 44

प्रधानमंत्री उद्या जगातल्या सर्वात उंचावरच्या रेल्वे पुलाचं उद्घाटन करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार असून, जगातला सर्वात उंचावरच्या चिनाब रेल्वे पुलाचं ते उद्घाटन करणार आहेत. स्थापत्यशास्त्रातलं आश्चर्य ठरेल असा चिनाब रेल्वे पूल नदीपात्रापासून ३५९ मीटर उंचीवर आहे, हा एक हजार ३१५ मीटर लांबीचा पूल पोलादी कमानीवर तोललेला आहे. भूकंप आणि सोसाट्याच्या वाऱ्यांना तोंड देण्याच्या दृष्टीने सक्षम केलेला आहे. या पुलामुळे जम्मू आणि श्रीनगरमधील संपर्क आता वाढू शकेल. त्याचबरोबर अंजी या देशातल्या पहिल्या केबल-स्टेड रेल्वे पुलाचं उद्घाटन, तसंच कटर...

June 5, 2025 9:38 AM

views 50

प्रधानमंत्री उद्या कटरा इथं रेल्वे सेवेचं उद्घाटन करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या कटरा इथं बहुप्रतीक्षित रेल्वे सेवांचं उद्घाटन करणार आहेत. वैष्णो देवी बेस कॅंपपासून बारामुल्लापर्यंत वंदे भारत रेल्वे सुरू होणार आहे. त्यामुळे जम्मू ते श्रीनगर दरम्यान थेट रेल्वेसेवा पहिल्यांदाच सुरू होत आहे. पंतप्रधान अंजी खेड या जगातल्या सर्वांत उंचावरच्या रेल्वे पुलाचंही उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमसाठी सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे

June 4, 2025 8:01 PM

views 28

सर्वांना स्वच्छ आणि परवडण्याजोगी ऊर्जा मिळावी यासाठी सरकार आग्रही – प्रधानमंत्री

मागच्या अकरा वर्षात देशातल्या ऊर्जा क्षेत्रात संरचनात्मक परिवर्तन झालं असूून जनतेला स्वच्छ आणि परवडण्याजोगी ऊर्जा मिळावी यासाठी  सरकार आग्रही आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. सुधारणा, हरित ऊर्जा उपक्रम आणि स्वावलंबन यासाठी सरकारचा विशेष आग्रह असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे सांगितलं. यासाठी त्यांनी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या एका लेखाचा दाखला दिला.    भारत जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे, तसंच एक धोरणात्मक शक्...

May 31, 2025 7:55 PM

views 50

पुण्यश्लाेक अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचं अनुकरण करण्याची गरज – प्रधानमंत्री

लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांचे विचार प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचं अनुकरण करण्याची आज गरज आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज भोपाळ इथं आयोजित ‘देवी अहिल्यादेवी होळकर महिला सशक्तीकरण महासंमेलनात’ बोलत होते. अहिल्यादेवींचं नाव ऐकताच मनात श्रद्धाभाव निर्माण होतो आणि कोणत्याही कठीण परिस्थितीत  राज्य, कसं पुढे न्यायचं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे, असं ते यावेळी म्हणाले.   अहिल्यादेवींनी एक उत्तम प्रशासक आणि लोकशाहीचं उत्तम प्रमाण सादर केलं. जलसंवर्धनाचं मह...

May 30, 2025 7:53 PM

views 37

बिहारमध्ये विविध विकासकामांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधल्या काराकट इथं ४८ हजार ५०० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली. यात साडेपाच हजार कोटी रुपयांचा चौपदरी पाटणा - गया - दोभी महामार्ग, २४९ कोटींचा गोपालगंज महामार्ग यांचाही समावेश आहे. रालोआ सरकार बिहारच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील आहे, लोकांपर्यंत शांतता, सुरक्षा आणि शिक्षण पोहोचवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.   वाहतूक, ऊर्जा, रेल्वे आदी क्षेत्रांना या प्रकल्पांमुळे लाभ होणार आ...

May 30, 2025 10:17 AM

views 28

प्रधानमंत्री उत्तरप्रदेश, बिहारमध्ये विविध विकासकामांचं उद्घाटन करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहार आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये ६९ हजार ४०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकासकामांचं उद्घाटन करणार आहेत. बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील विक्रमगंज इथं त्यांच्या हस्ते ४८ हजार ५२० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात येईल. प्रधानमंत्री या दौऱ्यात ऊर्जा, रस्ते आणि रेल्वे मार्गांशी संबंधित विविध प्रकल्पांचंही उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी ते उत्तरप्रदेशात कानपूर नगर इथं जवळपास २० हजार ९०० कोटी रुपयां...

May 29, 2025 3:19 PM

views 53

विकसित भारताचं स्वप्न पश्चिम बंगालच्या विकासाशिवाय अपूर्ण – प्रधानमंत्री

भारतीय अर्थव्यवस्था गॅस आधारित अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने प्रगती करत असून, पर्यावरण रक्षणासाठी ते पूरक ठरेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  ते आज पश्चिम बंगालमध्ये अलीपुरद्वार जिल्ह्यात शहर आधारित गॅस वितरण प्रकल्पाची पायाभरणी करताना बोलत होते. या प्रकल्पासाठी १ हजार १७ कोटी रुपये खर्च झाले असून, पश्चिम बंगालमधल्या अलीपुरद्वार आणि कूचबिहार जिल्ह्यातल्या नागरिकांना त्याचा लाभ मिळेल. या प्रकल्पातून घरोघरी स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा होईल.    विकसित भारताचं स्वप्न पश्चिम बं...

May 29, 2025 1:42 PM

views 40

सिक्कीमसह ईशान्येकडचा प्रदेश प्रगतीचा तेजस्वी अध्याय म्हणून उदयाला येत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

सिक्कीम सह ईशान्येकडचा संपूर्ण प्रदेश भारताच्या प्रगतीचा तेजस्वी अध्याय म्हणून उदयाला येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज सिक्कीम मधल्या विविध विकास कामांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करताना बोलत होते.    देशाचं प्रत्येक राज्य आणि प्रदेशाचं स्वतःचं वैशिष्ट्य आहे, आणि म्हणूनच, केंद्रसरकारनं ईशान्येकडच्या प्रदेशाला विकासाच्या केंद्रस्थानी आणलं आहे. तसंच आपल्या  'अ‍ॅक्ट ईस्ट' धोरणावर, सरकार  'अ‍ॅक्ट फास्ट' दृष्टिकोनानं काम करत आहे, असं ते यावेळी म्हणाले....