October 16, 2024 3:17 PM

views 119

मुंबईच्या ओशिवरा भागात इमारतीतल्या घराला लागलेल्या आगीत ३ जणांचा मृत्यू

मुंबईच्या ओशिवरा भागात आज एका इमारतीतल्या घराला लागलेल्या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका वृद्ध दांपत्याचा आणि त्यांच्या मदतनीसाचा समावेश आहे. ओशिवरा इथल्या रिया पॅलेस या इमारतीत दहाव्या मजल्यावर सकाळी साडे आठच्या सुमाराला आग लागली. या आगीच्या धुरामुळे चंद्रप्रकाश सोनी, ममता सोनी आणि त्यांचा मदतनीस पेलू बेटा यांचा गुदमरून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली असून या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

October 9, 2024 3:32 PM

views 65

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत अजिंक्य राहणे असेल मुंबई संघाचा कर्णधार

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठीचा मुंबई संघ जाहीर झाला असून, इराणी चषक स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटू तनुष कोटियन याला मुंबई संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. २०२४-२५ च्या या स्पर्धेच्या पहिल्या दोन फेऱ्यांसाठी १६ सदस्यीय मुंबई संघातून तनुष आपलं कसब दाखवेल. स्पर्धेच्या ‘एलिट ग्रुप ए’ चा सामना येत्या शुक्रवारी बडोद्यातल्या कोटांबी क्रीडांगणावर होत असून मुंबई संघाची लढत बडोदा संघाशी होईल. मुंबई संघाचा कर्णधार अजिंक्य राहणे आहे.

October 9, 2024 3:03 PM

views 47

वायू प्रदूषण रोखण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करा – मुंबई महापालिका आयुक्तांचे आदेश

मुंबई महानगर क्षेत्रातलं वायू प्रदूषण रोखणं आणि धूळ नियंत्रित करणं यासाठी मार्गदर्शक तत्‍त्‍वं जारी करण्‍यात आली आहेत, त्‍याची प्रभावीपणे अंंमलबजावणी करावी आणि प्रसंगी दंडात्‍मक कारवाई करावी, असे स्‍पष्‍ट निर्देश महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. यासंदर्भात उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांची पूर्तता करण्यासाठी समन्वय समिती गठीत करण्यात आली असून त्याची बैठक काल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झाली.  प्रत्‍यक्ष कार्यक्षेत्रस्‍थळी कार्यरत अधिकारी - कर्मचारी, पोलिस अंमलदारा...

October 7, 2024 3:38 PM

views 66

मुंबईतल्या माहीम इथं रहिवासी इमारतीमध्ये भीषण आग

मुंबईत माहीम इथं मोहित हाइट्स या रहिवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावर काल भीषण आग लागली. या आगीमुळे इमारतीतील काही रहिवासी अडकले होते, मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुरक्षित बाहेर काढलं. आगीत घरातलं सामानसुमान जळून खाक झालं. आगीचं कारण समजू शकलं नाही.

October 6, 2024 3:53 PM

views 65

मुंबईतल्या चेंबूर इथं लागलेल्या आगीत ७ जणांचा मृत्यू

मुंबईत चेंबूर इथं सिद्धार्थ कॉलनी परिसरात आज पहाटे एका दुमजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातल्या सात जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य दोन जण गंभीररीत्या होरपळले आहेत. इमारतीच्या तळमजल्यावर विजेच्या तारांजवळ शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचं अग्निशमन दल अधिकाऱ्यांनी सांगितलं.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि प्रशासकीय अधिकाऱ्याकडून घटनेची माहिती घेतली. दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये अर्थसहाय्य तसेच दोन जखमींच्या उपचाराचा खर्च ...

October 1, 2024 3:55 PM

views 54

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मुंबई तसंच ठाणे आणि कोकण विभागातल्या भाजप आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या मेळाव्यात  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मुंबईतले भाजपचे मंत्री, आमदार, खासदार भाग घेत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीच्या जागावाटपासंदर्भात गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याचं समजतं.

September 28, 2024 1:33 PM

views 155

मुंबईत दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असल्याच्या इशाऱ्यानंतर शहरात हाय अलर्ट जारी

मुंबईत दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असल्याचा इशारा केंद्रीय तपास यंत्रणांकडून मिळाल्यावर पोलिसांनी शहरात हाय अलर्ट जारी केला आहे. गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. आगामी नवरात्रौत्सव लक्षात घेऊन मंदिरं आणि प्रार्थनास्थळांवरही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येत आहे. प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचा त्यात समावेश आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं भाविकांसाठी नियम जाहीर केले आहेत. 

September 26, 2024 3:18 PM

views 45

महाराष्ट्रात मुंबई, ठाण्यासह राज्यभरात पावसाचं थैमान

मुंबईसह अनेक ठिकाणी काल मुसळधार पावसाने थैमान घातलं. मुंबईतले अनेक रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. पाऊस आणि वादळामुळे विमानतळावरची १६ उड्डाणं वळवण्यात आली. तसंच, अनेक रेल्वेगाड्याही थांबवाव्या लागल्या. मुसळधार पावसामुळे मुंबईसह, ठाणे, पालघर जिल्ह्यातल्या सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर झाली आहे.   राज्यात गेल्या २४ तासांत ६ जणांचा मृत्यू झाला असून २ जण जखमी तर ३ जण बेपत्ता आहेत. मुंबईत अंधेरीत पर्जन्य जलवाहिनीत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश म...

September 11, 2024 7:29 PM

views 51

मुंबई महानगरातील विविध रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरण कामं प्रगतीपथावर

मुंबई महानगरातील विविध रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरण कामं प्रगतीपथावर आहेत. सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहण्यासाठी त्रयस्थ संस्था म्हणून मुंबईतल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेची नियुक्ती केली आहे.  या कामकाजासाठी मुंबई महानगरपालिका आणि भारतीय तंत्रज्ञान संस्थेत आज सामंजस्‍य करार करण्‍यात आला. पालिका आयुक्‍त भूषण गगराणी, अतिरिक्‍त आयुक्‍त अभिजीत बांगर यांच्‍या उपस्थितीत या करारावर स्‍वाक्ष-या केल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली.

August 9, 2024 7:28 PM

views 61

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ८२० अंकांनी वधारला

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बाजार बंद होतांना ८२० अंकांनी वधारून ७९ हजार ७०६ अंकांवर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही २५० अंकांची वाढ होऊन तो २४ हजार ३६७ अंकांवर पोहोचला.