March 17, 2025 8:17 PM

views 53

Torres scam: मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेचं विशेष एमपीआयडी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल

टोरेस पाँझी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं आज विशेष एमपीआयडी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. या प्रकरणी आत्तापर्यंत सात जणांना अटक झाली आहे, तर १००पेक्षा जास्त जवाब नोंदवून घेतले आहेत. आरोपींवर विविध कलमांतर्गत खटला दाखल केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

March 15, 2025 2:56 PM

views 95

मुंबईत सोन्याची तस्करी करणाऱ्या ४ आरोपींना अटक

मुंबईत सीमाशुल्क विभागाने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सोन्याची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक  केली असून त्यांच्याकडून तस्करीचं साडेतीन कोटीपेक्षा जास्त किंमतीचंसोनं जप्त केलं आहे.   सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री संशयावरून एकाला ताब्यात घेतलं आणि त्याची झडती घेतली असता सोन्याची भुकटी असलेली पाकिटं त्याच्याकडे सापडली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी इतर दोघांनाही अटक केली आणि त्यांच्याकडून सोनं जप्त केलं.

March 15, 2025 2:15 PM

views 56

वेव्हज् परिषद १ मे पासून मुंबई इथं सुरू

वेव्हज् अर्थात जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद १ मे पासून मुंबई इथं सुरू होत आहे. विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांना एकाच व्यासपीठावर येण्याची संधी वेव्हज् उपलब्ध करून देणार आहे.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून वेव्हजचं आयोजन करण्यात आलं आहे.

March 9, 2025 6:48 PM

views 49

मुंबईत पाण्याची टाकी साफ करताना ४ कामगारांचा मृत्यू

मुंबईत नागपाडा मिंट रोड इथं आज निर्माणाधीन इमारतीच्या पाण्याची टाकी साफ करत असताना ४ कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. तर एक जण बचावला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन पाचही कामगारांना बाहेर काढलं आणि जे जे रुग्णालयात दाखल केलं. यातल्या चार कामगारांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. एक जणावर उपचार सुरू आहेत.  

March 6, 2025 8:35 PM

views 70

काँग्रेस नेते राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर

लोकसभेतले विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मुंबईतल्या धारावीला आज भेट दिली. धारावी इथं असलेल्या चमार स्टुडिओला भेट देत कारागिरांशी संवाद साधला.    धारावीत उद्योग-व्यवसाय करणाऱ्यांनी सर्वसमावेश उत्पादन साखळीच्या निर्मितीवर भर द्यावा, असा आग्रह राहुल गांधी यांनी केला. चमार स्टुडिओ हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचंही गांधी यांनी सांगितलं.

March 1, 2025 3:48 PM

views 72

अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून मुंबईत सुरु

राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून मुंबईत सुरु होणार आहे. अधिवेशनासाठी सुरक्षाव्यवस्था आणि तयारीचा आढावा काल घेण्यात आला.   विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सुरक्षा, वाहन तळ व्यवस्था, वैद्यकीय सुविधा अशा विविध बाबींचा आढावा घेतला. विधानभवनात काल झालेल्या या बैठकीला मुख्य सचिव सुजाता सौनिक, तसंच गृह, सामान्य प्रशासन, महानगरपालिका, वाहतूक, आरोग्य इत्यादी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

March 1, 2025 1:34 PM

views 58

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज एका दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज एका दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते के. पी. बी. हिंदुजा वाणिज्य महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होतील.

February 25, 2025 3:25 PM

views 66

मुंबईसह कोकणात उष्णतेची तीव्र लाट

मुंबईसह कोकणात सर्व जिल्ह्यांमधे पुढचे तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. या परिसरात तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअस पर्यंत वाढेल, असा अंदाज आहे. त्यामुळे हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे. 

February 16, 2025 3:43 PM

views 51

मुंबईत इमारतीला लागलेल्या आगीत २ महिलांचा मृत्यू, ५ जखमी

मुंबईतल्या मस्जिद बंदर भागात आज सकाळी एका इमारतीला लागलेल्या आगीत २ महिलांचा मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले. धुरामुळे गुदमरून जखमी झालेल्यांवर जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली आहे. पोलीस आगीच्या कारणांचा तपास करत आहेत.

February 14, 2025 7:37 PM

views 61

मुंबईत बेस्ट बसचा प्रवास महागणार !

मुंबईत बेस्ट बसचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांनी काल अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. बेस्टचा तोटा भरून काढण्यासाठी भाडेवाढ हा एकमेव उपाय असल्याने त्यावर विचार सुरू आहे. अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही, अशी माहिती श्रीनिवासन यांनी दिली आहे.