July 7, 2025 2:29 PM

views 72

CSMI विमानतळावर जप्तीच्या प्रकरणात चौघांना अटक

मुंबई सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्तीच्या तीन मोठ्या प्रकरणांमध्ये चार जणांना अटक केली. जप्तीमध्ये गांजा, तस्करी केलेले जीवंत आणि मृत वन्यजीव, आणि सोने यांचा समावेश असून, याची एकत्रित किंमत ११ कोटी रुपयांहून अधिक आहे. सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाकडून सुमारे नऊ किलो गांजा, तर दुसऱ्या प्रवाशाकडून तीन प्रजातींचे ३० जीवंत तर १४ मृत वन्यजीवांचे नमुने आढळले. तर तिसऱ्या घटनेत दुबईहून येणाऱ्या दोन प्रवाशांकडून सुमारे दीड किलो सोनं जप्त ...

June 27, 2025 10:00 AM

views 63

राज्यात यंदाच्या खरीप हंगामात आत्तापर्यंत 23 टक्के पेरण्या पूर्ण

राज्यात यंदाच्या खरीप हंगामात आत्तापर्यंत 23 टक्के म्हणजे 33 लाख 59 हजार 81 हेक्टर जमिनीवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत 19 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. राज्यात सर्वांत कमी पेरण्या कोकण विभागात आणि सर्वाधिक पेरण्या पुणे विभागात झाल्या आहेत. सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. सोयाबीनचं राज्यातलं सरासरी क्षेत्र 47 लाख 21 हजार 488 हेक्टर आहे. त्यापैकी 11 लाख 54 हजार 461 हेक्टरवर म्हणजे 24 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.   कपाशीची 27 टक्के क्षेत्रा...

June 23, 2025 8:39 PM

views 82

अंदाज समित्यांनी दिलेल्या शिफारसींमुळे प्रशासनाला योग्य दिशा मिळते – लोकसभेचे सभापती ओम बिर्ला

सरकारची धोरणं, योजना आणि कृतींवर अंदाज समित्यांनी दिलेल्या शिफारसींमुळे प्रशासनाला योग्य दिशा मिळत असल्याचं प्रतिपादन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केलं. ते आज मुंबईत राष्ट्रीय अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षं पूर्ण होत असल्यानिमित्ताने विधान भवनात आयोजित दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनावेळी बोलत होते. अंदाज समित्या या आर्थिक वाटप आणि अर्थसंकल्पीय खर्चाचं पारदर्शकतेने निरीक्षण करतात, असंही बिरला यावेळी म्हणाले. यावेळी बिरला यांच्या हस्ते वर्धापन दिन स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं. अर्थसंकल्...

June 22, 2025 7:08 PM

views 60

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी भरवलेल्या जनता दरबारात ९२ प्रकरणांचा निपटारा

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी भरवलेल्या जनता दरबारात आज ९२ प्रकरणांचा निपटारा झाला. मुंबईतल्या कांदिवली इथल्या गोयल यांच्या कार्यालयात झालेल्या या उपक्रमात अनेक नागरिकांनी आपले तक्रार अर्ज आणि निवेदनं सादर केली. त्याचप्रमाणे अनेक संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही आपल्या मागण्या आणि तक्रारी सादर केल्या. यापैकी अनेक प्रकरणात तत्परतेने कार्यवाही करण्याचे निर्देश गोयल यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिले. 

June 22, 2025 3:32 PM

views 77

संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विधान भवनात राष्ट्रीय परिषद

संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षे पूर्ण होत असून, या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद उद्या आणि परवा मुंबईत विधान भवनात आयोजित केली आहे.    या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत "प्रशासकीय कामं सक्षमपणे आणि कमी खर्चात होण्याकरता अर्थसंकल्पीय अंदाजांचं पुनर्विलोकन आणि प्रभावी नियंत्रणात अंदाज समितीची भूमिका" या विषयावर विचारमंथन होईल. परिषदेच्या समारोपानंतर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची वार्ताहर परिषद होईल.    संसदेच्या तसंच सर्व राज्यं आणि केंद्रशासि...

June 17, 2025 7:15 PM

views 66

मुंबईत सृजनशील आणि सांस्कृतिक रेडिओ महोत्सवाचं आयोजन

जागतिक संगीत दिनानिमित्त येत्या २१ जून रोजी देशातला पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक रेडिओ महोत्सव तसंच महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार सोहळा मुंबईत होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी वार्ताहर परिषदेत आज दिली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस उपस्थित राहणार आहेत.   राज्याची सांस्कृतिक, ऐतिहासिक परंपरा जपण्याचं काम रेडिओनं केलं असून देशाच्या स्वातंत्र्यापासून ते महाराष्ट्राच्या निर्मितीपर्यंत सर्व ऐतिहासिक घटनांचा रेडिओ साक्षीदार आहे, असं शेलार यावेळी म्...

June 17, 2025 7:47 PM

views 109

मुंबई पालिकेच्या रस्ते सिमेंट-काँक्रिटीकरण प्रकल्पाअंतर्गत १,३८५ रस्त्यांची कामं पूर्ण

मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते सिमेंट-काँक्रिटीकरण प्रकल्पाअंतर्गत १,३८५ रस्त्यांचं मिळून सुमारे ३४३ किलोमीटर लांबीची कामं पूर्ण झाली आहेत. ही पहिल्या दोन टप्प्यातली कामं ३१ मे पर्यंत झाली असल्याचं महानगरपालिकेच्या पत्रकात म्हटलं आहे. या कामात गुणवत्ता नियंत्रणासाठी आयआयटी मुंबई बरोबर महानगरपालिकेचा करार झाला होता. 

June 10, 2025 3:45 PM

views 72

मुंबईकरांना लवकरच एकाच तिकिटावर प्रवास करता येणार

मुंबईकरांना लवकरच एकाच तिकिटावर लोकल, बस, मेट्रो असा विविध माध्यमातून प्रवास करता येणार आहे. त्यासाठीच्या National Common Mobility Card चं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यावेळी उपस्थित होते. NPCI आणि स्टेट बँकेच्या सहकार्यानं मुंबई मेट्रो ३ नं हे कार्ड तयार केलं आहे. 

June 6, 2025 5:44 PM

views 76

मुंबईतल्या मिठी नदीच्या गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं मुंबई आणि केरळच्या कोची इथं १५ हून अधिक ठिकाणी टाकले छापे

मुंबईतल्या मिठी नदीच्या गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं आज मुंबई आणि केरळच्या कोची इथं १५ हून अधिक ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांमध्ये बॉलीवूड अभिनेता दिनो मोरिया, महानगरपालिकेचे सहाय्यक अभियंता प्रशांत रामुगडे आणि अनेक कंत्राटदारांच्या घरांचा समावेश आहे. मिठी नदीच्या गाळ उपसा घोटाळ्यात मुंबई महानगरपालिकेला ६५ कोटीं रुपयांचं नुकसान झालं असून त्याची पीएमएलए कायद्यांर्गत चौकशी सुरू आहे.

May 26, 2025 3:41 PM

views 76

मुंबईसह कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस

महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि झारखंडमधे सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस होत आहे.   महाराष्ट्रात मोसमी पावसाचं आगमन  नेहमीच्या वेळेच्या १० दिवस आधीच झालं असून कोकणात सर्वत्र तसंच सोलापूर, सांगली इत्यादी ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे.   राजधानी मुंबईत कालपासून वादळी पाऊस होत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीचा खोळंबा होत आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या रुळांवर अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे. सकाळी कार्यालयात...