July 5, 2024 3:16 PM

views 54

महाराष्ट्रालाही विशेष दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार – अर्थमंत्री अजित पवार

  बिहार आणि आंध्रप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रालाही विशेष दर्जा किंवा विशेष पॅकेज मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली. अर्थसंकल्पावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. भविष्यात उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार असल्याचं ते म्हणाले. राज्याच्या राजकोषीय तुटीविषयी अर्थसंकल्पावरील चर्चेत विविध सदस्यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यावर राज्यात ही तूट केंद्र सरकारने घालून दिलेल्या ३ टक्क्याच्या मर्यादेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. २०२८ पर्यंत राज्याची ...

July 5, 2024 9:47 AM

views 44

राज्यात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत विक्रमी ७१ टक्के पेरणी

महाराष्ट्रात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत विक्रमी 71 टक्के पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 1 लाख 10 हजार हेक्टरची वाढ झाल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल विधानसभेत दिली. आतापर्यंत 101 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या 3 जुलैच्या तुलनेत हे प्रमाण 20 लाख हेक्टरनं वाढलं आहे, असं त्यांनी सांगितलं. राज्यात कुठेही खतं आणि बियाणांचा तुटवडा नाही. नियोजनापेक्षा अधिक खतं आणि बियाणं उपलब्ध आहेत, असं ते म्हणाले.   राज्यातल्या दिवाळखोर सहकारी पतसंस्था आणि बँक...

July 4, 2024 7:26 PM

views 46

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतली घरं विकण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीनं मिळणार – मंत्री अतुल सावे

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतली घरं विकण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीनं दिलं जाणार असून अर्ज केल्यानंतर ४५ दिवसांत प्रमाणपत्र मिळेल, असं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतली घरं विकण्यासाठीच्या अनेक अटी शिथिल केल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.     बेस्टच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या पदांचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार पदभरती केली जाईल, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी. पदभर्तीसाठी आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असं ते म्हणाले. 

July 4, 2024 7:23 PM

views 41

विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनात कपात

आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी केलेलं निलंबन तीन दिवसांवर आणण्याचा प्रस्ताव विधानपरिषदेेनं आज एकमतानं मंजूर केला. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला. तो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.    विधानपरिषदेतल्या निवृत्त सदस्यांना आज निरोप देण्यात आला. वरिष्ठ सभागृहाचा नावलौकिक वाढवण्याचं काम या सदस्यांनी केल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले. येणाऱ्या सदस्यांना या सदस्यांचं काम काम...

July 4, 2024 7:18 PM

views 39

बुडवलेल्या ठेवीदारांचे किमान १ लाख रुपये परत मिळण्यासाठी स्वतंत्र निधीची उभारणी – मंत्री दिलीप वळसे पाटील

राज्यातल्या दिवाळखोर सहकारी पतसंस्था आणि बँकांनी बुडवलेल्या ठेवीदारांचे किमान एक लाख रुपये परत मिळण्यासाठी स्वतंत्र निधी उभारला जात आहे, अशी माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधानसभेत दिली.    मुंबईतल्या लोकमान्य टिळक रुग्णालय अर्थात सायन रुग्णालयात नव्यानं इमारती बांधून त्यात वाढीव रुग्ण खाटा, परिचारिका निवास, बाह्य रुग्ण विभाग यासह अनेक सुविधा दिल्या जातील अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली. पहिल्या टप्प्यात ६१६ कोटी रूपये खर्चून डिसेंबर २०२५ पर्यंत पहिली इमारत, त...

July 3, 2024 3:46 PM

views 52

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५ हजार रुपये मदतीची पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा

राज्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रती हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. यावर्षी लांब धाग्याच्या कापसाची सरकारी खरेदी, केंद्र सरकारनं नमूद केलेल्या नव्या दरानं होईल, असं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या अपुऱ्या पाणी पुरवठ्यावर चर्चा करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी येत्या शुक्रवारी आपल्या दालनात बैठक बोलावली आहे. आमदार आशीष शेलार यांनी आज विधानसभेत...

July 3, 2024 3:58 PM

views 40

निलंबनाचा फेरविचार करण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची उपसभापतींना पत्राद्वारे विनंती

सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल निलंबित झालेले विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माफी मागितली आहे.आपल्या निलंबनाचा फेरविचार करावा अशी विनंतीही त्यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्राद्वारे केली आहे. सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी ५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी दिलगिरीची भूमिका घेतली आहे, पक्षप्रमुखांनीही माफी मागितली आहे, त्यामुळे त्यांच्या निलंबनाच्या निर्णयावर फेरविचार करावा, अशी विनंती आमदार ...

July 3, 2024 12:17 PM

views 45

विधानपरिषदेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात अंमली पदार्थ आढळल्याचा मुद्दा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात मे महिन्यात अंमली पदार्थ आढळून आल्याचा मुद्दा आमदार विक्रम काळे यांनी उपस्थित केला. हा प्रश्न राज्यातल्या सर्व शासकीय महाविद्यालयांच्या सुरक्षिततेचा असल्याचं आमदार विक्रम काळे यांनी सांगितलं. तसेच, सुरक्षिततेच्यादृष्टीने कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत आणि या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल कधी येणार आहे असा सवालही आमदार विक्रम काळे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला.    उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या...

July 3, 2024 2:44 PM

views 31

डोंबिवली कारखाना स्फोट प्रकरणी आमदार उमा खापरे आक्रमक

डोंबिवली इथल्या कारखान्यात झालेला स्फोट आणि इथल्या कारखान्यांद्वारे होणारं प्रदूषण हा मुद्दा आमदार उमा खापरे यांनी विधानपरिषदेत मांडला. या दुर्घटनेतल्या पीडितांना काय मदत देण्यात आली आहे आणि इथलं प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी सरकार कोणत्या उपाययोजना करत आहे, असंही त्यांनी विचारलं.   मंत्री दीपक केसरकर यांनी या लक्षवेधीला उत्तर दिलं. या दुर्घटनेतील १३ कामगारांपैकी ११ जणांचा विमा काढलेला असून उर्वरित दोघांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्यात आले आहेत, असं केसरकर यांनी सां...

June 28, 2024 7:32 PM

views 55

राज्याच्या सादर झालेल्या अतिरीक्त अर्थसंकल्पावर विरोधकांची टीका

फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. सरकारनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पाच्या नावाखाली महायुतीचा निवडणूक जाहीरनामाच सादर केला आहे, असा आरोप त्यांनी केला.     हा अर्थसंकल्प आश्वासनांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर असून  त्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी न देता त्यांची लूट करण्यात आली  आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.    दिशाभूल करणारा अर्थसंकल्प अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ...