July 26, 2024 7:18 PM

views 41

गेल्या सहा वर्षात १६ कोटी ८३ लाख नवीन रोजगार निर्मिती – राज्यमंत्री शोभा करंदलाजे

संसदेच्या दोन्ही सभागृहात आज कामकाजाची सुरुवात कारगिलमधल्या शहीदांना आदरांजली अर्पण करून झाली. गेल्या सहा वर्षात १६ कोटी ८३ लाख नवीन रोजगार निर्माण झाल्याची माहिती कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी आज संसदेत दिली. या ६ वर्षांच्या कालावधीत देशात एकूण रोजगारामध्ये ३५ टक्के वाढ झाली असल्याचं त्यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितलं. लोकसभा आणि राज्यसभेत आजही अर्थसंकल्पावर चर्चा झाली.

July 25, 2024 8:11 PM

views 53

यंदाच्या अर्थसंकल्पावर संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा

लोकसभेत आज सत्तारूढ आणि विरोधी पक्षांमध्ये झालेल्या जोरदार गदारोळाच्या पार्श्वभूमीवर सभागृहाचं कामकाज दोनदा स्थगित करण्यात आलं. काँग्रेसचे सदस्य चरणजीत सिंग चन्नी यांनी अर्थसंकल्पावरच्या चर्चेत बोलताना पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांचे आजोबा यांच्या हत्येचा उल्लेख केला. यावरून बिट्टू आणि चन्नी यांच्यात जोरदार वाद सुरु झाला. या गोंधळात पीठासीन अधिकाऱ्यांनी सदनाचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर, या मुद्द्यावर चर्चा स...

July 23, 2024 8:20 PM

views 57

केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २ लाख ६२ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद

केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये रेल्वेसाठी आतापर्यंतची सर्वाधिक २ लाख ६२ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. रेल्वेच्या एकूण अर्थसंकल्पातल्या १ लाख ८ हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांची तरतूद सुरक्षे संबंधित कामांसाठी राखीव ठेवण्यात आले असल्याचं त्यांनी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना सांगितलं.

July 23, 2024 9:03 PM

views 65

रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास, MSME आणि मध्यमवर्गीयांना प्राधान्य देणारा अर्थसंकल्प सादर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज चालू आर्थिक वर्षाचा पूर्ण अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. त्यात रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास, सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योग आणि मध्यमवर्गीयांवर यात विशेष लक्ष देण्यात आलं आहे. नवीन आयकर पद्धत स्विकारणाऱ्यांसाठी त्यांनी विविध सवलतींची घोषणा यात केली. याशिवाय त्यांनी रोजगार निर्मितीसाठी ५ योजनांसाठीचं प्रधानमंत्री पॅकेज, ५ वर्षात ४ कोटींहून अधिक युवकांच्या कौशल्य विकासासाठीची योजना जाहीर केली.    कृषी क्षेत्रात उत्पादन वाढ, रोजगार निर्मिती आणि कौशल्य वृद...

July 23, 2024 8:51 PM

views 65

अर्थसंकल्प २०२४ : नवीन आयकर प्रणाली अंतर्गत वाढीव करसवलती

नवीन आयकर प्रणालीचा स्वीकार करणाऱ्यांसाठी आणखी कर सवलतींचा लाभ देण्याची घोषणा सीतारामन यांनी आजच्या अर्थसंकल्पात केली. अतिरीक्त १ लाख रुपयांच्या उत्पन्नाला त्यांनी विद्यमान दरापेक्षा कमी कर लादण्याची घोषणा केली. त्यामुळं पगारदारांना आता साडे १७ हजार रुपये कमी आयकर भरावा लागेल. नवीन कर प्रणालीत आता ३ लाख रुपयांपर्यंत काहीही कर द्यावा लागणार नाही. ३ ते ७ लाख दरम्यान उत्पन्न असणाऱ्यांना ५ टक्के, ७ ते १० लाख दरम्यान उत्पन्न असणाऱ्यांना १० टक्के, १० ते १२ लाख दरम्यान उत्पन्न असणाऱ्यांना १५ टक्के, १२ ...

July 23, 2024 6:40 PM

views 69

तरुणांना इंटर्नशिपची संधी म्हणजे काँग्रेसच्या न्यायपत्राची नक्कल – प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

या अर्थसंकल्पात शेतमालाच्या हमीभावासंबधी तरतूद नाही, शेती साहित्यावर आकारला जाणारा १८ टक्के जीएसटी कमी करण्याबाबत, शेतकऱ्याच्या उत्पन्नवाढीबाबत तसंच मनरेगाबाबतही काही उल्लेख नाही याकडे लक्ष वेधत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अर्थसंकल्पावर टीका केली. पाच वर्षात एक कोटी तरुणांना इंटर्नशिपची दिलेली संधी म्हणजे काँग्रेसच्या न्यायपत्राची नक्कल असल्याचं सांगत अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीबाबत ठोस धोरण नाही असं पटोले म्हणाले.

July 23, 2024 6:34 PM

views 61

भारताच्या भविष्यावर मोठी गुंतवणूक करणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकरी, महिला, युवा आणि गरीब या घटकांना समोर ठेवून केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा भारताच्या भविष्यावर मोठी गुंतवणूक करणारा आहे असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. सिंचन, ग्रामीण रस्ते सुधार योजना, कृषी तसंच एमयुटीपी, मुंबई मेट्रो, नागपूर मेट्रो, पुणे मेट्रो, दिल्ली मुंबई कॉरिडॉर अशा अनेक योजनांसाठी मिळणार असलेल्या निधीबद्दल सांगून फडणवीस यांनी या अर्थसंकल्पात राज्यासाठी भरीव तरतूदी असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं.

July 23, 2024 3:47 PM

views 68

भारताच्या विकासाची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प – चंद्रशेखर बावनकुळे

अतिशय सकारात्मक आणि भारताच्या विकासाची पायाभरणी करणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या भारताच्या विकासाला बळकटी देणारा आणि देशातल्या सर्व समाजघटकांच्या अपेक्षांची पूर्तता करणारा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.   भारताच्या १०० शहरांमध्ये प्लग अँड प्ले औद्योगिक पार्कची निर्मिती करण्याच्या धोरणामुळे मोठे बद...

July 23, 2024 3:41 PM

views 56

देशाला विश्वशक्ती बनण्याच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारचा हा अर्थसंकल्प देशवासियांची मनं जिंकणारा आणि देशाला विश्वशक्ती बनण्याच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. भारताच्या १०० शहरांमध्ये प्लग अँड प्ले औद्योगिक पार्कची निर्मिती करण्याच्या धोरणामुळे मोठे बदल घडतील तसंच यामुळे भारतातील उद्योग आणि उद्योजकतेला गती मिळेल, अशी प्रतिक्रिया राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

July 23, 2024 3:22 PM

views 64

अर्थसंकल्पात सामान्यांना दिलासा नाही – राहुल गांधी

सामान्य नागरिकांना या अर्थसंकल्पामुळे कोणताही दिलासा मिळालेला नाही. हा अर्थसंकल्प म्हणजे काँग्रेसचा जाहीरनामा आणि मागचे अर्थसंकल्प यांची नक्कल आहे, अशी प्रतिक्रिया लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली आहे.   सरकारला पाठिंबा देणाऱ्या राज्यांना या अर्थसंकल्पात भरभरून देण्यात आलं मात्र देशाला सर्वाधिक कर देणाऱ्या राज्याला अर्थसंकल्पात दुय्यम वागणूक दिल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.