October 8, 2024 8:51 PM

views 50

राज्यातल्या १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचं उद्या प्रधानमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन

राज्यातल्या १० नव्या शासकीय महाविद्यालयांचं उद्घाटन उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. मुंबई, अंबरनाथ, नाशिक, जालना, बुलडाणा, हिंगोली, वाशिम, अमरावती, भंडारा आणि गडचिरोलीमध्ये ही महाविद्यालयं आहेत. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीसह केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी.नड्डा, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांसह वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्री...

October 8, 2024 9:34 AM

views 65

महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांत संविधान भवन उभारणार असल्याची केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची घोषणा

आगामी काळात महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांत संविधान भवन उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत केली. विरोधक संविधानाबद्दल सामान्य नागरिकांची दिशाभूल करत आहेत. नागरिकांच्या मनातला हा संभ्रम दूर व्हावा, याकरता संविधान भवनाच्या माध्यमातून वास्तव स्थितीची माहिती करून देण्यात येईल असं रिजिजू म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारच्या आर्थिक सहकार्यातून उभारण्यात येणाऱ्या या संविधान भवनातून अल्पसंख्याक वर्गाच्या समस्यांचा निपटारा करण्यात येईल, तसंच ...

October 7, 2024 8:22 PM

views 47

राज्यातल्या सहकारी संस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणुकांसाठी आणखी वेळ

महाराष्ट्र सरकारनं सर्व सहकारी संस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक पुढे ढकलली आहे. विधानसभा निवडणुकीमुळे ३१ डिसेंबरपर्यंत या निवडणुका पुढे ढकलत असल्याचा शासन आदेश सरकारनं आज जारी केला. अडीचशे पेक्षा कमी सदस्य असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था आणि न्यायालयाने आदेश दिलेल्या सहकारी संस्थाच्या निवडणुका नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होतील, असंही सरकारनं या आदेशात स्पष्ट केलं आहे.

October 7, 2024 7:40 PM

views 56

राज्यात १० टक्के नक्षलवादी शिल्लक राहिल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांचं प्रतिपादन

राज्यात माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात यश आलं आहे.  २०१३ च्या तुलनेत सध्या राज्यात केवळ १० टक्के नक्षलवादी शिल्लक असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. प्रथमच गडचिरोली जिल्ह्याचा उत्तर भाग सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त झाला असल्याचं ते म्हणाले. देशातल्या नक्षलप्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आज नवी दिल्ली इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी राज्यातल्या परिस्थितीविषयी मुख्यमंत्री शिंदे यांनी माहिती दिली.    नक्षलग्रस्त भागातल्य...

October 7, 2024 8:09 PM

views 47

देशाच्या विकासाच्या मार्गात नक्षली कारवाया हा मोठा अडथळा – केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन

नक्षलवादाने कोणाचंही भलं झालेलं नाही. नक्षलवादी मार्ग चोखाळणाऱ्या सर्वांनी मुख्य प्रवाहात येऊन शस्त्रांचा त्याग करावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. देशातल्या नक्षलप्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आज अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झाली, त्यानंतर ते बोलत होते. नक्षलवादी कारवायांविरुद्धची लढाई अंतिम टप्प्यात असून सर्व घटकांकडून सहकार्य मिळाल्यास मार्च २०२६ पर्यंत देश पूर्णपणे नक्षलमुक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, ...

September 30, 2024 9:04 PM

views 177

राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय

राज्यातले होमगार्ड, कोतवाल, ग्राम रोजगार सेवकांना मानधन वाढ, विशेष शिक्षकांच्या पावणे ५ हजारांहून अधिक पदांची निर्मिती आणि निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याचे निर्णय राज्य सरकारनं आज घेतले. होमगार्डला मानधन ५७० रुपयांवरुन १ हजार ८३ रुपये होईल. याशिवाय उपहार, कवायत, खिसा, भोजन असे विविध भत्ते दिले जातील.  कोतवालांना मानधनात १० टक्के वाढ आणि अनुकंपा धोरण राज्य सरकार लागू करणार आहे. ग्राम रोजगार सेवकांना आता ७ हजार रुपये मानधन आणि प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे. याश...

September 29, 2024 3:38 PM

views 44

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रातल्या ११ हजार २४० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण

महाराष्ट्रातल्या ११ हजार २४० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. पुण्यातल्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मेट्रो सेवेचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झालं. त्याचबरोबर २ हजार ९५५ कोटी रुपये खर्चाच्या पुणे मेट्रो स्वारगेट- कात्रज विस्ताराची पायाभरणीही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली. पुण्यातल्या भिडेवाडा इथल्या सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मारकाचं भूमिपूजनही मोदी यांनी केलं....

September 27, 2024 7:24 PM

views 31

राज्यातल्या विविध धरणांमधे ८८ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा

राज्यातल्या विविध धरणांमधे सध्या ८८ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. मुंबईच्या अनेक भागांत आज सकाळी जोरदार पाऊस झाला. हवामान विभागानं आज मुंबई, पालघर, रायगड आणि उत्तर महाराष्ट्र या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. नवी मुंबई परिसरात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागातही आज जोरदार पाऊस होऊ शकतो, असं हवामान विभागानं कळवलं आहे.    नाशिक मधल्या धरणांमधला पाणीसाठा वाढला असून गंगापूर धरणासह १३ धरणांमधून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. या पाव...

September 26, 2024 8:17 PM

views 53

राष्ट्रीय पोषण महिना उपक्रम राबविण्यात महाराष्ट्र आघाडीवर

केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या सातव्या राष्ट्रीय पोषण महिना उपक्रमा अंतर्गंत आतापर्यंत ९ कोटी ६८ लाखांहून अधिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. यावर्षी राबवण्यात येत असलेल्या या अभियानात महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेश राज्यांनी चांगली कामगिरी केली असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे.    ॲनिमिया प्रतिबंध, पौष्टिक आहार आणि कल्याणकारी अभियानांतर्गत सुमारे एक कोटी ८८ लाख कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. एक कोटी ४५ लाख कार्यक्रमांत पूरक आहार सेवनावर आधा...

September 26, 2024 3:18 PM

views 38

महाराष्ट्रात मुंबई, ठाण्यासह राज्यभरात पावसाचं थैमान

मुंबईसह अनेक ठिकाणी काल मुसळधार पावसाने थैमान घातलं. मुंबईतले अनेक रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. पाऊस आणि वादळामुळे विमानतळावरची १६ उड्डाणं वळवण्यात आली. तसंच, अनेक रेल्वेगाड्याही थांबवाव्या लागल्या. मुसळधार पावसामुळे मुंबईसह, ठाणे, पालघर जिल्ह्यातल्या सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर झाली आहे.   राज्यात गेल्या २४ तासांत ६ जणांचा मृत्यू झाला असून २ जण जखमी तर ३ जण बेपत्ता आहेत. मुंबईत अंधेरीत पर्जन्य जलवाहिनीत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश म...