October 14, 2024 3:01 PM

views 35

विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसची दिल्लीत बैठक

आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी आज काँग्रेसची दिल्लीत बैठक होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. तसंच महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेतेही उपस्थित राहतील, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. हरियाणा विधानसभेत झालेल्या पराभवानंतर महाराष्ट्रातल्या निवडणुकीसाठी रणनिती आखण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे.

October 14, 2024 3:37 PM

views 49

दिवाळीत होणारी भाडेवाढ मागे घेण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय

दिवाळीत गर्दीच्या हंगामामुळं होणारी भाडेवाढे मागे घेण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे. २५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान ही भाडेवाढ होणार होती. यासंदर्भातलं पत्रक शुक्रवारी महामंडळानं प्रसिद्ध केलं होतं. हे पत्रक मागे घेत असल्याचं एसटी महामंडळानं आज जाहीर केलं.

October 11, 2024 7:20 PM

views 30

राज्यात विविध ठिकाणच्या रस्त्यांच्या विकासकामांचं भूमीपूजन

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे राज्यात विविध ठिकाणच्या रस्त्यांच्या विकासकामांचं भूमीपूजन आज झालं. या कार्यक्रमाला मंत्री रविंद्र चव्हाण दूरस्थ माध्यमातून उपस्थित होते.  यावेळी २४ जिल्हे आणि ४४ विधानसभा मतदारसंघात १२ हजार ७६८ कोटी रुपये किंमतीच्या १ हजार ४८० किलो मीटर लांबीच्या दु-पदरी सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्यांचं भूमिपूजन झालं. 

October 10, 2024 4:06 PM

views 41

शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी, लोहार, नाथपंथीय समाजासाठी महामंडळं स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

राज्य सरकारनं आज शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी-वाणी, लोहार, नाथपंथीय समाज, पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी महामंडळं स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढ करण्यासह मदरश्यांमधल्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करायलाही राज्य मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.   राज्यातल्या अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरं सुरू करणं, तीन नव्या खासगी विद्यापीठांना मान्यता देणं, कायमस्वरुपी विनाअनुदान तत्वावर नवीन समाजकार्य महाव...

October 9, 2024 7:28 PM

views 34

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राज्यातल्या ७,६०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी

महाराष्ट्रात दहा वैद्यकीय महाविद्यालयं स्थापन होणं हा लाखो लोकांचं भलं करण्यासाठीचा महायज्ञ आहे, यामुळे राज्यातल्या युवकांसाठी नव्या संधीची दारं उघडतील, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राज्यातल्या सात हजार ६०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची दूरदृश्यप्रणालीद्वारे पायाभरणी केली. तसंच राज्यातल्या नवीन दहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत इतक्या वेगाने आणि व्यापक स्तरावर कध...

October 9, 2024 6:58 PM

views 36

राज्यात कोणतीही योजना बंद होणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्याची आर्थिक परिस्थिती मजबूत असल्याने लाडकी बहीणसह कोणतीही योजना बंद करण्यात येणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. पिंपरी-चिंचवड शहरातल्या विकासकामांचे भूमीपूजन,  उद्घाटन आणि लोकार्पण त्यांनी केलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचं सांगून  देशात सर्वात जास्त वस्तू आणि सेवा कर महाराष्ट्रातून मिळतो, असं त्यांनी स्पष्ट केलं. 

October 9, 2024 8:09 PM

views 43

वेगवान विकास महाराष्ट्राने याआधी कधीही पाहिला नसल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

राज्यात गेल्या काही वर्षात विकासाचे अनेक प्रकल्प सुरू झाले आणि त्यातले अनेक पूर्ण झाले आहेत, यापूर्वी एवढा वेगवान विकास महाराष्ट्राने पाहिलेला नाही, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राज्यातल्या सुमारे सात हजार सहाशे कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आज प्रधानमंत्र्यांनी दूरस्थ पद्धतीने केली त्यावेळी ते बोलत होते. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा हे मराठी माणसाचं स्वप्न नुकतंच केंद्रसरकारच्या निर्णयामुळे साकार झाल्याचा उल्लेख त्यांनी केला.   राज्यात...

October 9, 2024 3:25 PM

views 39

महायुतीची बुथस्तरावरील समन्वयासाठी विधानसभा समन्वयकांची नियुक्ती

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीने बुथस्तरावरील समन्वयासाठी राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांसाठी विधानसभा समन्वयकांची नियुक्ती केली आहे. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत या समन्वयकांच्या नावांची घोषणा करण्यात आली.   विधानसभा निवडणुकांचं जागावाटप आणि उमेदवारीबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना देण्यात आले आहेत, असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. महायुती सरकारने मोफत सिलेंडर योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, विविध सिंचन योजना, महिलांसाठी मोफत उच्चशिक्षण, मोफ...

October 8, 2024 8:41 PM

views 39

अयोध्येत महाराष्ट्र भक्त सदन इमारत बांधणीचं भूमिपूजन

अयोध्येत राम जन्मभूमी मंदिर परिसरात महाराष्ट्र भक्त सदन इमारत बांधणीचं भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण व उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. महाराष्ट्रातील जनतेसाठी हा आनंदाचा क्षण असल्याचं रविंद्र चव्हाण यावेळी म्हणाले. ही इमारत पर्यावरण पूरक असून साडे ९ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर बांधण्यात येणार असून त्याला १२ मजले असतील. यात ४ व्हीआयपी कक्ष, ९६ खोल्या आणि ४० डॉर्मिटरींचा समावेश आहे.

October 8, 2024 8:31 PM

views 32

राज्यात शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा

राज्यातल्या शाळांमध्ये ४ हजार ८६० विशेष शिक्षकांची पदं निर्माण करायला राज्य सरकारनं आज मंजुरी दिली. त्यातल्या २ हजार ९८४ पदांवर सध्या कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या शिक्षकांचं समयोजन केलं जाणार आहे. त्यांना शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार समकक्ष वेतनश्रेणी लागू असेल.