November 14, 2024 7:34 PM

views 75

महाराष्ट्र विकसित भारताचं ग्रोथ इंजिन होईल, प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

महाराष्ट्राचा विकास हीच महायुतीची प्राथमिकता असून महाराष्ट्र विकसित भारताचं ग्रोथ इंजिन होईल, असं भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज खारघर इथं प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं केलेल्या कामाचा आढावा घेतला. केंद्र सरकारन दहा वर्षांत २५ कोटी लोकांना गरीबी रेषेच्या वर काढलं, चार कोटी बेघर लोकांना घर दिलं, जलजीवन मिशनद्वारे बारा कोटी घरांना पाणी दिलं, बारा कोटी गरीबांच्या घरी शौचालय बनवलं असं मोदी यांनी सांगितलं.     महायुती सरका...

November 11, 2024 7:56 PM

views 39

काँग्रेसच्या २८ पदाधिकाऱ्यांचं सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन

विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करत उमेदवारी दाखल केल्याबद्दल तसंच पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल काँग्रेसने विविध मतदारसंघातल्या २८ पदाधिकाऱ्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं आहे. ही कारवाई प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या आदेशावरून तसंच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून केल्याची माहिती काँग्रेसचे प्रशासन आणि संघटन उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी दिली. कारवाई केलेल्या पदाधिकाऱ्यात आनंदराव गेडाम, शिलु चिमुरकर, सोनल कोेवे, भरत येरमे, अभिलाषा गावतुर...

November 6, 2024 7:02 PM

views 40

महाराष्ट्रात महायुतीचं  सरकार आवश्यक आहे – योगी आदित्यनाथ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं आपण महाराष्ट्रात आलो असून देशाला सक्षम करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचं सरकार आवश्यक आहे, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज वाशिम इथं झालेल्या जाहीर सभेत सांगितलं.   एकजुटीनं राष्ट्रविरोधी शक्तीच्या विरोधात लढा द्या, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी वाशिम मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघातले भाजपचे उमेदवार श्याम खोडे उपस्थित होते. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मूर्तिजापूर  मतदारसंघात महायुतीचे ...

November 6, 2024 7:56 PM

views 42

भारतीय राज्यघटना हा फक्त ग्रंथ नसून जगण्याचा मार्ग आहे – राहुल गांधी

काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आज नागपूर इथं संविधान संमेलनात सहभागी झाले होते. संविधान हे केवळ एक पुस्तक नसून, जीवन जगण्याचं माध्यम आणि तत्वज्ञान आहे, असं त्यांनी यावेळी नमूद केलं. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विकास, प्रगती, अर्थव्यवस्था अशा शब्दांच्या आडून राज्यघटनेवर हल्ला करतात, असा आरोप त्यांनी केला. जाती आधारित जनगणना हा लोकांचा आवाज असून, तो संसदेपर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे, असंही राहुल गांधी म्हणाले. तत्पूर्वी त्यांनी, नागपूर इथल्या दीक्षाभूमीत डॉक्टर बाब...

November 6, 2024 11:10 AM

views 40

विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू

विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी काल प्रचाराचा नारळ फोडला. तर वंचित बहुजन आघाडीनं काल जाहीरनामा प्रसिद्ध केला. महायुतीतर्फे शिवसेनेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये एकत्रित जाहीर सभा घेत प्रचाराचं रणशिंग फुंकलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही काल राज्यात ठीकठिकाणी ...

November 5, 2024 2:51 PM

views 156

राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर संजय वर्मा यांची नियुक्ती

राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर आज संजय वर्मा यांची नियुक्ती झाली. ते १९९० च्या तुकडीचे भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी आहेत. सध्या ते कायदा आणि तंत्रज्ञान विषयक पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. एप्रिल २०२८ मध्ये ते निवृत्त होणार आहेत.    काँग्रेस आणि इतर पक्षांनी केलेल्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं काल रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवण्याचे आणि त्यांची  तात्काळ बदली करण्याचे आदेश दिले होते. तसंच विवेक फणसळकर यांच्याकडे या पदाचा तात्पुरता कार्यभार सोपवला होता.  

November 4, 2024 8:07 PM

views 36

राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी ‘या’ नावांची चर्चा

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तात्काळ बदली करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. काँग्रेस आणि इतर पक्षांच्या तक्रारीनंतर आयोगानं ही कारवाई केली आहे. नवीन महासंचालकांच्या नियुक्तीसाठी तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावं पाठवण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. या पदासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सेवेतले वरिष्ठ अधिकारी संजय वर्मा आणि रितेश कुमार या तिघांच्या नावांची चर्चा आहे. सध्या विवेक फणसळकर यांच्याकडे कार्यभार सोपवला आ...

October 24, 2024 7:17 PM

views 27

राज्य सरकारच्या सेवेतल्या कर्मचाऱ्यांना चालू महिन्याचं वेतन आणि निवृत्तीवेतन उद्यापर्यंत मिळणार

राज्य सरकारच्या सेवेतल्या कर्मचाऱ्यांना चालू महिन्याचं वेतन आणि निवृत्तीवेतन उद्यापर्यंत मिळणार आहे. यासंदर्भातल्या विविध प्रणालींमधला डेटा टाटा कम्युनिकेशन्सकडून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडे हस्तांतरित केला जातोय. त्यासाठी पुढच्या आठवड्यात या प्रणाली बंद राहणार असल्यानं लवकर वेतन देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. जिल्हापरिषद, विद्यापीठ, विविध शैक्षणिक संस्था यातल्या कर्मचाऱ्यांनाही यंदा लवकर वेतन मिळेल.

October 21, 2024 2:56 PM

views 53

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभेसाठी जागावाटपाबाबत चर्चांना वेग

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या बैठका होत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडीमधे घटक पक्षांच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहेत.

October 19, 2024 7:29 PM

views 44

पुढील काळात राज्यावर आर्थिक संकट ओढवू शकतं – सु्प्रिया सुळे

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सध्या वाईट स्थितीत असून पुढील काळात राज्यावर आर्थिक संकट ओढवू शकतं असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्या आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होत्या.    राज्य सरकार कर्जाच्या ओझ्याखाली असूनही कोट्यवधींच्या जाहिरातींसाठी करदात्याच्या पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल अर्थतज्ञ  तसंच भारतीय जनता पक्षासह  मित्रपक्षांचे  नेते चिंता व्यक्त करत आहेत, आणि असंच सुरू राहिल्या...