December 1, 2024 7:15 PM

views 42

राज्यात येत्या 5 डिसेंबरला सरकार स्थापन होणार

महायुतीमध्ये कसलाही वाद नाही असं सांगत महाराष्ट्रात  येत्या गुरुवारी 5 डिसेंबर ला शपथविधी होऊन सरकार स्थापन होईल असं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. राज्यात भाजपचा मुख्यमंत्री आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उपमुख्यमंत्री बनतील असं त्यांनी काल स्पष्ट केलं.  दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ५ डिसेंबरला मुंबईतल्या आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी होणार अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाजमाध्यमावरून दिली ...

November 30, 2024 3:25 PM

views 36

राज्यात नोव्हेंबर महिन्यातच गारठा वाढला

राज्यात नोव्हेंबर महिन्यातच थंडीची तीव्र लाट पसरली आहे. पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये या महिन्यात सर्वाधिक गारवा जाणवत असून जिल्ह्यांमध्ये तापमान दहा अंश सेल्सिअस किंवा त्याहीपेक्षा कमी राहिलं. येत्या तीन दिवसांत काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येईल, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. राज्यभरात तापमानात लक्षणीय घट झाल्यानं थंडीचा जोर वाढत आहे. परभणी जिल्ह्यात आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं केली आहे. विदर्भातही तापमान कमी असून,...

November 30, 2024 1:34 PM

views 55

संसदेत विरोधी पक्षाच्या मागण्या स्वीकारल्या जात नसल्यामुळे संसदीय लोकशाहीचं पालन होत नसल्याची ज्येष्ठ नेते शरद पवार यांची टीका

संसदेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या मागण्या स्वीकारल्या जात नाहीत, याचा अर्थ देशात संसदीय लोकशाहीचं पालन नीट होत नाहीय, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलताना केली. हे योग्य नसून यासाठी लोकांमध्ये जाऊन जागृती घडवून आणण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. निवडणुकीच्या निकालानंतर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली असून देशात हे प्रथमक घडत असल्याचं पवार म्हणाले. मतदान यंत्राबद्दल काही शंका आहेत, मात्र याबद्दल ठोस पुरावा नाही. काही जणांनी पुनर्मोजणीची मागणी केल...

November 29, 2024 8:29 PM

views 38

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा विजय हा सरकारच्या धोरणांवर आणि योजनांवर जनतेच्या विश्वासाचं निदर्शक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

ओदिशा पाठोपाठ, हरियाणा, आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा दणदणीत विजय हा लोकांचा सरकारच्या धोरणांवर आणि योजनांवरचा विश्वास दर्शवतो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री तीन दिवसांच्या ओदिशा दौऱ्यावर असून आज भुवनेश्वरमध्ये बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ त्यांची एक सभा झाली. केंद्रातलं भाजपा सरकार ओदिशाला प्राधान्य देत असून ओदिशामध्ये भाजपाचे सरकार स्थापन झाल्यावर लगेच महिलांसाठी सुभद्रा योजनेसारखी अनेक मोठी पावलं उचलण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. विरोधक...

November 29, 2024 1:41 PM

views 78

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची नवी दिल्लीत अमित शहा यांच्यासमवेत बैठक

महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी काल रात्री मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा देखील यावेळी उपस्थित होते. भाजपाचं वरिष्ठ नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील, तो आम्हाला पूर्णपणे मान्य असेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आधीच स्पष्ट केलं आहे. दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणुकीत अमित ...

November 17, 2024 7:11 PM

views 34

राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा काँग्रेसचा आरोप

राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या, लॉरेन्स बिश्नोई टोळीनं बॉलिवुड अभिनेत्यांना दिलेल्या धमक्या इत्यादी प्रकरणांकडे त्यांनी लक्ष वेधलं आणि या सगळ्याला महायुतीच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचा आरोप त्यांनी केला.

November 17, 2024 7:44 PM

views 51

‘महायुती सत्तेत आल्यानंतरच राज्य प्रगतीपथावर पुढं गेलं, यानंतरही पुढंच नेऊ’

महायुतीचं सरकार आल्यानंतरच राज्य प्रगतीच्या मार्गावर पुढे गेलं असून, यापुढंही आपण ते पुढंच नेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळ्यात साक्री इथं झालेल्या प्रचारसभेत दिलं. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी आपण केंद्र सरकारची मदत घेतली. त्यानंतर सोयाबीनला प्रतिक्विंटल ४ हजार ८९२ रुपये किंमत देण्याचा निर्णय केंद्र शासनानं घेतल्याचं शिंदे यावेळी म्हणाले.    नंदुरबार जिल्ह्यात धडगाव इथंही त्यांनी आज प्रचारसभा घेतली. आचार संहिता संपल्यानंतर मोलगी तालुक्याची निर्मिती करण...

November 15, 2024 7:20 PM

views 46

विरोधक महाराष्ट्रला पिछाडीवर नेण्याचं काम करत असल्याची जे. पी. नड्डा यांची टीका

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने उत्तम काम केलं असून विरोधक महाराष्ट्राला पिछाडीवर नेण्याचं काम करत असल्याची टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज केलं. ठाण्यात आज झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. भाजपा सबका साथ, सबका विकास करताना देशातल्या गरीब घटकाची प्रगती करणार असल्याचं आश्वासन नड्डा यांनी या सभेत दिलं.

November 15, 2024 6:47 PM

views 35

राज्यात सत्तेत बदल करण्याशिवाय पर्याय नाही – शरद पवार

राज्यात ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांचा अनुभव चांगला नसल्यानं सत्तेत बदल करण्याशिवाय पर्याय नाही, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी इथं आयोजित प्रचारसभेत बोलत होते. सत्ता बदलण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करा, असं आवाहन त्यांनी केलं.

November 15, 2024 6:41 PM

views 113

सोयाबीन खरेदीसाठी भावांतर योजना लागू करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

सोयाबीन खरेदी करताना किमान आधारभूत किंमतीतली तफावत दूर करण्यासाठी भावांतर योजना लागू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिलं. नांदेडमधल्या प्रचारसभेत ते बोलत होते. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी महायुतीच्या आश्वासनांची आठवण उपस्थितांना करुन दिली.    दरम्यान, कांद्याची बेकायदा साठवणूक करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांवर संबंधित अधिनियमांनुसार  कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा तसंच पणन विभागा...