August 7, 2026 8:16 PM

views 26

कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताची रक्षिता आणि अश्मिता यांची उपांत्य फेरीत धडक

    कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत रक्षिताने आपलीच सहकारी तन्वी शर्माचा २१-१८, १९-२१, १९-२१ असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत तिचा सामना आणखी एक भारतीय खेळाडू अश्मिता चालिहा हिच्याशी होईल.   अश्मिताने अव्वल मानांकित हिना अकेचीचा २०-२२, २१-१५, २१-१९ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर आजच्याच सत्रात, पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्ण प्...