August 6, 2026 3:16 PM

views 59

देशाच्या काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, आसाममध्ये पुराच्या बळींची संख्या ९५ वर

 देशाच्या काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाने कहर केला असून, आसाममध्ये पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे. चौदा जिल्ह्यांमधल्या सुमारे १ लाख ६० हजार नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ९५ वर पोचली आहे.  पूराचा सर्वाधिक फटका बसलेल्या शिवसागर जिल्ह्यात ५० जणांचा बळी गेला. तर चराईदेव जिल्ह्यात २१ जण दगावले. आसामच्या सहा जिल्ह्यांमध्ये सरकारने एकूण १०० मदत केंद्रं सुरू केली आहेत. इतर जिल्ह्यातल्या बांधबंधारे, रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचंही पुरामुळे नुकसान झालं आहे....

August 5, 2025 7:13 PM

views 48

आगामी ४ दिवस राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

राज्यात आजपासून पुढचे चार दिवस अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.   कोकण तसंच गोव्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या तामिळनाडूच्या किनारपट्टीवर चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होत असून, अरबी समुद्रात पूर्व-पश्चिम दिशा असलेला कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यासह देशभरात हवामान बदलेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे...