October 3, 2024 8:37 PM

views 58

इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांदरम्यान गाझामध्ये भूकबळींची संख्या वाढण्याची शक्यता

इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांदरम्यान गाझामध्ये भूकबळींची संख्या वाढण्याची शक्यता उनरवा, अर्थात संयुक्तराष्ट्राचे पॅलेस्टीनच्या पूर्वेकडच्या विस्थापितांसाठीच्या पुनर्वसन कार्याचे आयुक्त, जनरल फिलिप लाझारिनी यांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केली आहे. गाझामधल्या 10 लाखांहून अधिक लोकांना ऑगस्टमध्ये अन्नधान्य मिळाले नाही आणि सप्टेंबरपर्यंत ही संख्या 10 लाख 40 हजार पेक्षा जास्त झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. 

September 10, 2024 12:29 PM

views 68

गाझा पट्टीचा दक्षिणेकडचा भाग आणि मानवतावादी क्षेत्रवर इस्राएलनं केलेल्या हल्ल्यात किमान ४० जणांचा मृत्यू

गाझा पट्टीचा दक्षिणेकडचा भाग आणि मानवतावादी क्षेत्र म्हणून निर्धारित करण्यात आलेल्या प्रदेशात इस्राएलनं केलेल्या हल्ल्यात किमान ४० नागरिकांचा मृत्यू झाला असून, ६० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत, तर  अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत, असं हमास या संघटनेच्या नागरी संरक्षण विभागानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.  तर,  खान युनिस भागात हमास या अतिरेकी संघटनेच्या केंद्रावर आपल्या वायुदलानं हल्ला केला असून, स्थानिक नागरिकांचा त्यापासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्याचं इस्राएलच्या लष्करान...

September 7, 2024 12:48 PM

views 65

मध्य आणि दक्षिण गाझा पट्टीमध्ये इस्रायली बॉम्बहल्ल्यात १० पॅलेस्टिनी नागरिक ठार

मध्य आणि दक्षिण गाझा पट्टीत इस्रायलने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात जवळपास दहा पॅलेस्टिनी नागरिक मारले गेल्याची माहिती पॅलेस्टाईनमधल्या सूत्रांनी दिली आहे. मध्य खान यूनिस शहरातल्या कंदील कुटुंबाच्या घरावर इस्रायली लष्कराने केलेल्या हल्ल्यात पाच जण ठार झाले तर काही जण जखमी झाले. तसंच मध्य गाझातल्या नुसेरत निर्वासित छावणीतल्या शेहदा कुटुंबाच्या घरावर केलेल्या हल्ल्यात पाच जण मृत्यूमुखी पडले. घरांच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता गाझाच्या आरोग्य विभागानं वर्तवली आहे. याआधी मागच्या शुक्रवारी इस्...

August 31, 2024 2:25 PM

views 59

गाझापट्टीत पुकारलेल्या युद्धात आत्तापर्यंत ४० हजार ६०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यु

गाझा पट्टीतल्या खान युनिस आणि डेर अल बलाह या शहरांच्या अनेक भागांमध्ये कामगिरी पूर्ण केल्यानंतर इस्रायलचं सैन्य इथून माघारी फिरल्याची माहिती इस्रायली लष्करानं दिली आहे. खान युनिस शहरातल्या काही भागांना आता मानवतावादी प्रदेश म्हणून मान्यता देण्यात आली असून या भागातले रहिवासी आणि विस्थापित झालेले पॅलेस्टाइनचे नागरिक इथं परत येऊ शकतात, असं इस्रायलच्या लष्कराचे प्रवक्ते अविचाइ आद्राइ यांनी सांगितलं आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हमासनं दक्षिण इस्रायलवर हल्ला करून १२०० नागरिकांना मारल्यानंतर इस्र...

August 1, 2024 8:32 PM

views 34

दक्षिण गाझात केलेल्या हवाई हल्ल्यात हमास सेनेचा प्रमुख मोहम्मद डेईफ मारला गेल्याची इस्रायली सैन्याकडून पुष्टी

गेल्या महिन्यात गाझाच्या दक्षिण भागात केलेल्या हवाई हल्ल्यात हमासचा लष्करी प्रमुख मोहम्मद डेईफ मारला गेल्याची माहिती इस्रायली सैन्यानं दिली आहे. १३ जूनला गाझाच्या खान युनिस केलेल्या हल्ल्याचं लक्ष्य डेईफच होता. तो हमासची लष्करी शाखा असलेल्या कासम ब्रिगेडच्या प्रमुखांपैकी एक होता. त्यानं २० वर्षांहून अधिक काळ या दलाचं नेतृत्व केलं होतं. गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या दक्षिण इस्रायलवरच्या हल्ल्याचा सूत्रधार डेईफ हाच होता, अशी माहिती इस्रायल सैन्याच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

July 27, 2024 8:05 PM

views 67

गाझामध्ये इस्राएलच्या हल्ल्यात शाळेत आश्रय घेतलेले ३० पॅलेस्टिनी ठार, १०० हून अधिक जण जखमी

गाझाच्या मध्यवर्ती भागात इस्राएलनं केलेल्या हल्ल्यात आज एका शाळेत आश्रय घेतलेले किमान ३० पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले तर १०० हून अधिक जण जखमी झाले. मात्र, आपण शाळेच्या आवारात असलेल्या हमासच्या तळावर हल्ला केल्याचं इस्राएलच्या लष्करानं सांगितलं आहे. या शाळेच्या आश्रयानं शस्त्रास्त्रांचा साठा केला जात असून इस्राएलच्या फौजांवर हल्ले चढवले जात असल्याचं इस्राएलच्या लष्करानं म्हटलं आहे.