August 12, 2025 1:37 PM

views 55

इस्रायलने गाझापट्टीत ६ पत्रकारांना मारल्याचा संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क कार्यालयाकडून निषेध

इस्रायलने गाझापट्टीत हल्ला करून सहा पत्रकारांना मारल्याचा संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क कार्यालयानं निषेध केला आहे. या हत्येची निःपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी व्हावी असं संयुक्त राष्ट्राचे महासचिव अंतोनियो गुटेरस यांनी म्हटल्याचं संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टिफन दुजारीक यांनी सांगितलं. मारल्या गेलेल्या पत्रकारांपैकी पाच जण अल जझिरा या माध्यमसंस्थेचे वार्ताहर होते, तर एक जण स्थानिक पत्रकार होता. माध्यम अधिकार गट आणि कतारने सुद्धा या हत्येचा निषेध केला आहे. ब्रिटन सरकार या घटनेचा गांभीर्याने वि...

June 17, 2025 8:08 PM

views 66

दक्षिण गाझामधे इस्रायलनं केलेल्या गोळीबारात ५१ ठार, २०० जखमी

दक्षिण गाझामधल्या मदत केंद्राजवळ इस्रायली सैन्याने केलेल्या गोळीबारात ५१ जणांचा मृत्यू झाला असून २०० जण जखमी झाले आहेत. इस्रायली सैन्याने खान युनुस शहरातल्या मदत केंद्रावर गोळीबार केला, असं गाझाच्या नागरी संरक्षण संस्थेनं म्हटलं आहे. इस्रायली लष्कराने याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.   इराण आणि इस्रायल यांच्यातला संघर्षही सलग पाचव्या दिवशी सुरू आहे. इस्रायलमधल्या तेल अविव आणि जेरुसलेम इथं इराणने क्षेपणास्त्रं डागल्याचं इस्रायली लष्कराने म्हटलं आहे. तर इस्रालयलवर आतापर्यंतच्या सर्वात त...

May 30, 2025 1:34 PM

views 62

इस्रायलची गाझामध्ये ६० दिवसांच्या युद्धबंदी प्रस्तावाला सहमती

इस्रायलने गाझामध्ये ६० दिवसांच्या युद्धबंदी प्रस्तावाला सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेने जाहीर केलं आहे. व्हाईट हाऊसच्या माहिती सचिव, कॅरोलिन लेविट यांनी माध्यमांना काल ही माहिती दिली. मध्य पूर्वेतील अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेत हमासला युद्धबंदी प्रस्ताव सादर केला. त्याला इस्रायलने मान्यता दिल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रस्तावात ६० दिवसांच्या युद्धबंदीचा, १० जिवंत ओलिसांची सुटका करण्याचा आणि १८ मृत ओलिसांच्या अवशेषांना मायदेशी परत करण्याचा ...

April 13, 2025 7:44 PM

views 46

गाझामधल्या शेवटच्या कार्यरत रुग्णालयावर इस्त्रायलचा हवाई हल्ला

गाझामधलं शेवटचं पूर्णपणे कार्यरत रुग्णालय अल अहली बॅप्टिस्ट रुग्णालयाचा काही भाग इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त झाला आहे.  या रुग्णालयात हमासचे कमांड आणि कंट्रोल केंद्र असल्यामुळे या रुग्णालयावर हल्ला केल्याचं इस्रायलच्या संरक्षण दलानं म्हटलं आहे. गाझाच्या नागरी आपत्कालीन सेवेनुसार, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. इस्रायल आणि हमास यांच्यातल्या युद्धबंदी कराराचा पहिला सहा आठवड्यांचा टप्पा या वर्षी १ मार्च रोजी संपला. युद्धबंदीवरील चर्चेचा दुसरा टप्पा रखडला आहे. १८ मार्चपासू...

April 6, 2025 6:25 PM

views 65

ओलीस ठेवलेल्या बंधकांच्या सुटकेसाठी इस्त्रायल नागरिकांची निदर्शनं

गाझामध्ये अद्याप ओलीस ठेवलेल्या इस्त्रायली बंधकांच्या सुटकेसाठी इस्त्रायल सरकारनं हमाससोबत वाटाघाटी कराव्यात या मागणीसाठी इस्त्रायलचे हजारो नागरिक दररोज निदर्शनं करत आहेत. ओलीस ठेवलेल्या बंधकांच्या सुटकेच्या बदल्यात युद्धविराम करावा या मागणीला सुमारे ६९ टक्के इस्रायलींनी पाठिंबा दर्शवल्याचं एका सर्वेक्षणात दिसलं आहे. तेल अवीव इथं नुकत्याच झालेल्या रॅलीत या निदर्शकांनी युद्धविराम आणि वाटाघाटी करण्याची मागणी केली. तर गेल्या २४ तासांत इस्त्रायलनं केलेल्या हवाई आणि जमिनीवरच्या  हल्ल्यांमुळे ६० जणांच...

March 22, 2025 10:49 AM

views 49

इस्रायलच्या सैन्याला गाझाचे अधिक भूभाग ताब्यात घेण्याचे आदेश

इस्रायल आणि गाझामधील युद्धविराम संपल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढत चालला आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काटझ् यांनी सैन्याला गाझाची अधिक भूभाग ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत.   पॅलेस्टिनी भूभागातून ताब्यात घेतलेल्या उर्वरीत ओलिसांना मुक्त करत नाही तोपर्यंत तो भूभाग अंशतः ताब्यात घेण्याची धमकी दिल्याचं स्थानिक वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. या भागातील कारवाई वाढत असल्याची पुष्टी इस्रायली सैन्याने केली आहे.   इस्रायलने नव्याने केलेल्या हल्ल्यात 590 हून अधिक पॅलिस्टिनी मारले गेले अस...

March 20, 2025 10:18 AM

views 52

इस्त्राईलचा गाझा पट्टीवर हवाई हल्ला, ४०० नागरिक ठार

इस्त्राईलने हमास विरुद्धच्या युद्धात अधिक सैन्य अभियानाचा विस्तार करून गाझा पट्टीवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला असून त्यात किमान 400 पॅलेस्टाईन नागरिक मारले गेल्याचा अंदाज आहे. ऑक्टोबर 2023 पासून इस्त्राईल हमास युद्ध सुरू झाल्यापासून हा सर्वात मोठा हल्ला आहे.   इस्त्राईलचे पंतप्रधान बेंज्यामीन नेत्यानाहू यांनी काल इस्राईलच्या दूरचित्रवाणी मध्यमावरून बोलताना सांगितल की, आता युद्ध सुरू असतानाच पुढील चर्चा सुरू राहील. इस्राईलच्या उरलेल्या बंधकांची सुटका करण्यासाठी युद्धाचा दबाव आणण...

January 28, 2025 1:49 PM

views 44

इस्रायली सैन्याची युद्धबंदी कराराअंतर्गत गाझापट्टीतून माघार घ्यायला सुरुवात

इस्रायली सैन्याने युद्धबंदी कराराअंतर्गत गाझापट्टीतून माघार घ्यायला सुरुवात केली आहे. त्यानंतर हमासने या आठवड्यात तीन इस्रायली ओलिसांना सुपूर्द करायला सहमती दर्शवल्यानंतर काल गाझामधल्या पॅलेस्टिनी नागरिकांची सुटका करण्यात आली. हमासने दक्षिण इस्रायल भागावर केलेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या युद्धात गाझाच्या उत्तर भागातले सुमारे साडे सहा लाख पॅलेस्टिनी नागरिक विस्थापित झाले होते.

January 4, 2025 2:40 PM

views 45

गाजा पट्टीत संपूर्ण संघर्षविराम व्हावा, यासाठी कतारच्या दोहामध्ये इस्रायलबरोबर अप्रत्‍यक्ष चर्चा सुरु

गाजा पट्टीत संपूर्ण संघर्षविराम व्हावा, यासाठी कतारच्या दोहामध्ये इस्रायलबरोबर अप्रत्‍यक्ष चर्चा सुरु झाली आहे. हमासनं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. व्‍यापक आणि अस्‍थायी संघर्ष विराम तसंच गाजामधून इस्रायली सैनिकांची माघार हे मुद्दे या चर्चेच्या केंद्रस्थानी असतील. विस्थापित पॅलेस्टिनी नागरिकांना त्वरित आणि सुरक्षितपणे माघारी आणण्याबद्दलही चर्चा होणार आहे. या चर्चेसाठी आपलं शिष्टमंडळ दोहा इथे पाठवल्याचं इस्राएलनं म्हटलं आहे. कतार, इजिप्त आणि अमेरिकेच्या मध्यस्थीतून गेल्या एक वर्षापासून संघर्ष विरा...

October 20, 2024 1:40 PM

views 55

इस्रायलनं गाझाच्या उत्तर भागातल्या बेत लाहिया परिसरात केलेल्या हल्ल्यात ७० जणांचा मृत्यू

इस्रायलनं गाझाच्या उत्तर भागातल्या बेत लाहिया परिसरात केलेल्या हल्ल्यात ७० जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण गाडले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. मदत आणि बचावकार्य सुरू असल्याची माहिती गाझा सरकारच्या माध्यम कार्यालयानं दिली आहे. इस्राईल लष्करानं गाझाच्या उत्तर भागात सुरू केलेल्या मोहिमेमुळे या परिसरात अन्न, पाणी आणि वैद्यकीय सेवांसारख्या अनेक सुविधा खंडित आहेत. इस्राईलच्या सुरक्षा दलांनी मात्र हमासच्या आरोपांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत संख्या वाढवून सांगितली जात असल्याच...