August 3, 2024 4:04 PM

views 44

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या विरोधात केलेले आरोप खोटे – देवेंद्र फडणवीस

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या विरोधात केलेले आरोप खोटे असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलिस अधिकारी सचिन वाजे यांच्या आधारे नागपुरात सांगितलं. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना अटक करण्याचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर दबाव टाकला, असा आरोप अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयानं सचिन वाजे याच्या गुन्हेगारी प्र...

August 2, 2024 6:31 PM

views 46

नागपूरसाठी १२०० कोटींहून जास्त निधीचा विकास आराखडा मंजूर – उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर जिल्ह्यासाठी बाराशे कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीचा विकास आराखडा जिल्हा नियोजन विकास बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ५ हजार कोटीपेक्षा जास्त मूल्याची कामं राज्य शासनाच्या वतीने करण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी समितीच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना दिली. नागपूर शहरात सगळीकडे विकासकामं सुरू असल्याने खोदकाम आणि वाहतूक वळवण्यात आल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे, पण ही कामं वेगाने पूर्ण करू, असं आश्वासनही फ...