October 3, 2025 3:21 PM

views 433

भारत-वेस्ट इंडिज कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताची आघाडी

भारत-वेस्ट इंडिज कसोटी क्रिकेट मालिकेत पहिल्या सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी भारताने  १७८ धावांची आघाडी घेतली आहे. अहमदाबादमधे सुरु असलेल्या या  सामन्याच्या कालच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र, भारताने वेस्ट इंडीजचा पहिला डाव १६२ धावात गुंडाळला. दिवस अखेर भारताच्या  २ बाद १२१ धावा झाल्या होत्या. के. एल. राहुलनं दमदार फलंदाजी करत शतक पूर्ण केलं. मात्र, जस्टीन ग्रीव्हज्‌च्या चेंडूवर तो झेलबाद झाला. शुभमन गिल देखील अर्धशतक करून बाद झाला.

October 2, 2025 6:12 PM

views 91

भारतानं वेस्ट इंडीजचा पहिला डाव १६२ धावात गुंडाळला

भारत-वेस्ट इंडिज कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं आज पहिल्याच दिवशी वेस्ट इंडीजचा पहिला डाव १६२ धावात गुंडाळला, आणि दिवसअखेर २ गडी गमावून १२१ धावा केल्या.   अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. मात्र त्यांचे फलंदाज चांगली कामगिरी करु शकले नाहीत. जस्टीन ग्रीव्हच्या ३२ धावा ही त्यांची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. सामन्यातले ३५ चेंडू बाकी असताना १६२ धावांवर त्यांचा डाव आटोपला. भारतातर्फे मोहंमद सिराजनं ४, जसप्र...

September 22, 2025 10:27 AM

views 59

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर ६ गडी राखून विजय

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल रात्री दुबई इथं झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला. पाकिस्ताननं दिलेलं 172 धावांचं आव्हान भारतानं 18 षटकं आणि 5 चेंडूत साध्य केलं. सलामीवीर अभिषेक शर्मानं सहा चौकार आणि पाच षटकारांसह 39 चेंडूत 74 धावा केल्या तर शुभमन गिलनं 28 चेंडूत 47 धावा करत अभिषेकसह 105 धावांची सलामी भागीदारी केली. अभिषेक शर्मा सामनावीर ठरला. या स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला होता.

September 20, 2025 3:43 PM

views 68

आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभर विकेट्स घेणारा अर्शदीप हा पहिला भारतीय खेळाडू

आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभर विकेट्स घेणारा अर्शदीप हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. अबुधाबी इथं ओमानविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात त्याने टी-ट्वेंटीमधला आपला शंभरावा बळी घेतला.   अर्शदीपचा हा सदुसष्ठावा आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामना होता. अफगाणिस्तानच्या राशिद खानने ५३ सामन्यांमध्ये तर श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगाने ६३ सामन्यांमध्ये १०० बळींचा विक्रम केला आहे. अर्शदीप हा आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामन्यात 100 बळी घेणारा जगातला तिसरा सर्वात जलद गोलंदाज ठरला आहे.

September 17, 2025 2:50 PM

views 55

महिला क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सामना सुरू

महिला क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना सुरू आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. पहिल्या सामन्यातल्या पराभवानंतर हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वात भारतीय संघ दुसरा सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील आहे.   भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आगामी आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची तयारी करत असल्यानं ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे.शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भा...

September 15, 2025 10:19 AM

views 66

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर विजय

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील ग्रुप एच्या सामन्यात काल भारताने पाकिस्तान संघावर 7 गडी राखून विजय मिळवला. दुबईमध्ये झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघानं 19 षटकं आणि 3 चेंडूत 127 धावा केल्या.   ही लक्ष्य पार करताना अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने 25 चेंडू शिल्लक असतानाच हा विजय मिळवला. हा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित करत असून पेहलगाम हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबियांसोबत संघ उभा असल्याचं  कर्णधार सुर्यकुमार य...

September 11, 2025 7:44 PM

views 82

महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय १६ जणांचा संघ जाहीर

पहिल्यावहिल्या दिव्यांग महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकासाठी भारताने सोळा जणांचा संघ जाहीर केला आहे. या संघाचं नेतृत्व कर्णधार दीपिका टी सी ही करेल.   तर उपकर्णधारपदाची धुरा महाराष्ट्राची गंगा कदम सांभाळणार आहे. ११ ते २५ नोव्हेंबर दरम्यान नवी दिल्ली आणि बंगळुरू इथं ही स्पर्धा होईल. यात भारतासह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि अमेरिका हे संघ सहभागी होतील.

September 11, 2025 2:28 PM

views 58

भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानचा नकार

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतला भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. येत्या १४ सप्टेंबर रोजी हा सामना होणार आहे.   पहलगाम इथला दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान विरुद्ध खेळल्याने राष्ट्रीय प्रतिष्ठेला धक्का बसेल, त्यामुळे हा सामना रद्द करावा अशी याचिका कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी केली होती. त्यावर तातडीने सुनावणी घ्यायला आज न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी आणि विजय बिश्नोई यांच्या पीठाने...

September 11, 2025 1:34 PM

views 48

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताची विजयी सलामी

दुबई इथं सुरू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत, अ गटात भारताने काल संयुक्त अरब अमिरातीच्या संघावर ९ गडी राखून विजय मिळवला. युएईच्या संघानं ५८ धावाचं लक्ष्य भारतापुढे ठेवलं होतं, ते केवळ ४ षटकं आणि तीन चेंडूत पूर्ण करताना केवळ एक गडी गमावला.   अभिषेक वर्मानं १६ चेंडूत ३० धावा केल्या तर त्याला शुभमन गिलनं २० धावा करत साथ दिली. तत्पुर्वी भारतानं युएईला १३ षटकं १ चेंडूत ५७ धावांवर बाद केले.   आजचा सामना बांगला देश आणि हाँगकाँग यांच्यात, अबुधाबी इथं होणार आहे.

September 10, 2025 1:43 PM

views 55

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची संयुक्त अरब अमिरातीशी लढत

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पहिला सामना आज दुबईत संयुक्त अरब अमिरातीशी होणार आहे.    स्पर्धेतल्या काल झालेल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने हाँगकाँगवर ९४ धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना ६ बळीच्या बदल्यात १८८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना हाँगकाँगच्या संघाला ९४ धावांपर्यंतच मजल मारता आली.    येत्या २८ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या स्पर्धेच्या अ गटात भारत, पाकिस्तान, ओमान आणि यूएईचा समावेश आहे. तर ब गटात श्रीलंका, अफगाणिस्तान, हाँगकाँग आणि बांग...