October 29, 2025 1:32 PM

views 93

भारत – ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान टी-२० सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला आज पहिला सामना

क्रिकेटमध्ये, भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांदरम्यान ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज कॅनबेरा इथं रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी पावणेदोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा पराभवाचा सामना केल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताचा संघ टी-२० मालिका जिंकायचं लक्ष्य ठेवून मैदानात उतरणार आहे.

October 25, 2025 8:23 PM

views 96

3rd ODI Cricket: भारतानं सामना जिंकला, रोहित शर्माचं शतक

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ इथं रंगलेल्या आजच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा ९ गडी राखून पराभव केला. तीन सामन्यांच्या या मालिकेतील या आधीचे दोन्ही सामने आणि मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली आहे.   ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ४६ षटकं आणि  ४ चेंडूत २३६ धावा केल्या.  भारतान केवळ ३८षटकं ३ चेंडूत ही धावसंख्या पार केली. रोहित शर्माच्या १२१ धावांच्या खेळीला विराट कोहलीनं ७४ धावा काढून चांगली साथ दिली. या दोघांच्या १६७ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं हा व...

October 23, 2025 2:35 PM

views 103

Cricket 2nd ODI: भारताचं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २६५ धावांचं आव्हान

भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या तीन एकदिवसीय क्रिकेट मालिकतेल्या, ॲडलेड इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २६५ धावांचं आव्हान ठेवलं आहे.   या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. सातव्या षटकातच कर्णधार आणि सलामीवर शुभमन गील ९ धावांवर, तर विराट कोहली शुन्यावर बाद झाला. त्यानंतर माजी कर्णधार रोहीत शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या गड्यासाठी ११८ धावांची भागिदारी करत भारताचा...

October 20, 2025 12:55 PM

views 117

ऑस्ट्रेलियाची भारतावर ७ गडी राखून मात

क्रिकेटमध्ये, पर्थ इथं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं काल भारतावर ७ गडी राखून मात केली. पावसाच्या व्यत्ययामुळं सामना चार वेळा थांबवण्यात आला. वेळ कमी पडल्यामुळे सामना २६ षटकांपर्यंत मर्यादित करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं २६ षटकांत ९ बाद १३६ धावा केल्या. डकवर्थ-लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १३१ धावांचं लक्ष्य होतं. ते त्यांनी २२व्या षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयामुळं तीन सामन्यांच्य...

October 19, 2025 2:52 PM

views 122

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान, तीन सामन्यांची एक दिवसीय क्रिकेट मालिका सुरू

भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या तीन सामन्यांच्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेला आजपासून पर्थ इथं सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. पण भारतीय फलंदाज पारशी चमक दाखवू शकले नाही. सलामीवर रोहित शर्मा ८ तर कर्णधार शुभमन गिल दहा धावा करून झटपट बाद झाले. तर विराट कोहलीला भोपळाही फोडता आला नाही. पावसामुळे सामना सुरू व्हायला उशीर झाला, त्यामुळे हा सामना ३२ षटकांचा खेळला जाईल.  शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या १६ षटकांमध्ये ४ बाद ५२  धावा झाल्या होत्या...

October 14, 2025 8:15 PM

views 99

वेस्ट इंडिज विरुद्धची कसोटी मालिका भारतानं जिंकली

क्रिकेटमधे वेस्ट इंडीजविरुद्धचा दुसरा कसोटी सामना भारतानं ७ गडी राखून जिंकला. या विजयामुळं भारतानं ही मालिकाही २-० अशी जिंकली आहे. वेस्ट इंडिज विरोधात कसोटी मालिकेतला भारताचा हा सलग १० वा विजय आहे. या सामन्यात कुलदीप यादव सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला, तर मालिकावीराचा मान रविंद्र जाडेजाला मिळाला.

October 14, 2025 1:28 PM

views 259

वेस्ट- इंडीज विरुद्धचा दुसरा क्रिकेट कसोटी सामना भारत विजयी

क्रिकेटमधे वेस्ट इंडीजविरुद्धचा दुसरा कसोटी सामना भारताने ७ गडी राखून जिंकला असून ही   मालिकाही २-० अशी  जिंकली आहे. नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आज खेळ  सुरु झाला तेव्हा भारताला विजयासाठी ५८ धावांची आवश्यकता होती.   ३ गड्यांच्या मोबदल्यात भारतीय संघाने १२१ धावा केल्या.  वेस्ट इंडिज विरोधात कसोटी मालिकेतला भारताचा हा सलग १० वा विजय आहे. या सामन्यात कुलदीप यादव सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला,  तर मालिकावीराचा मान रविंद्र जाडेजाला मिळाला.

October 13, 2025 8:14 PM

views 81

वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी कसोटी जिंकण्यासाठी भारताला ५८ धावांची गरज

वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा कसोटी सामन्यात विजयासाठी भारताला आणखी ५८ धावा कराव्या लागणार आहेत. फॉलोऑननंतर आज चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजनं पहिल्या डावातली पिछाडी भरून काढली, आणि दुसऱ्या डावाअखेर १२० धावांची आघाडी घेतली. कालच्या २ बाद १७३ धावावरून वेस्ट इंडिजनं आज पुढं खेळायला सुरुवात केली. जॉन कॅम्पबेल आणि शाई होप यांनी तिसऱ्या गड्यासाठी १७७ धावांची भागीदारी करत वेस्ट इंडिजला डावाच्या पराभवाच्या नामुष्कीतून बाहेर काढलं. कॅम्पबेलनं ११५, तर शाई होपनं १०३ धावा केल्या. ३९० धावांवर त्यांचा डाव संपला. &nb...

October 12, 2025 7:23 PM

views 202

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजवर फॉलो ऑनची नामुष्की

भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघात दिल्लीत अरुण जेटली मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजचा  संघ ९७ धावांनी पिछाडीवर आहे.    आज सकाळी तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरू झाला तेव्हा पाहुण्या संघानं कालच्या धावसंख्येवरून खेळायला सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांच्या अचूक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजचा संघ गडगडल्यानं जेवणाच्या विश्रांतीपूर्वी   त्यांना फॉलोऑन मिळाला. त्यानंतर पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या वेस्ट इंडिज संघाची अडखळत सुरुवात झाली. चहाप...

October 5, 2025 6:31 PM

views 180

विदर्भानं तिसऱ्यांदा पटकावलं ‘इराणी चषक’

प्रथम वर्ग क्रिकेट मध्ये नागपूर इथं झालेल्या स्पर्धेत, विदर्भानं आज शेष भारत संघाचा ९३ धावांनी पराभव करत तिसऱ्यांदा इराणी चषकावर नाव कोरलं. विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या पाच दिवसांच्या सामन्यात विदर्भानं पहिल्या डावात, अथर्व तायडेच्या १४३ आणि यश राठोडच्या ९१ धावांच्या जोरावर ३४२ धावा केल्या, तर शेष भारताचा डाव २१४ धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात विदर्भानं २३२ धावा केल्या. त्यामुळे त्यांची एकूण आघाडी ३६० धावांची झाली. त्यानंतर,  शेष भारताचा दुसरा डाव २६७ धावात गुंडाळला. हर्ष दुबेनं...