September 17, 2025 8:58 PM

views 84

लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचं कर्ज देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

प्रत्येक गावात जिल्हा बँकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचं कर्ज देऊन शासन त्यांना आर्थिक पाठबळ देईल. त्यातून उद्योग व्यवसाय करुन त्या स्वावलंबी बनतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या किनगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’चा शुभारंभ आज झाला. त्यावेळी ते बोलत होते.   राज्यातल्या एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवण्याचा  संकल्प असल्याचा निर्धार त्यांनी याव...

September 17, 2025 3:09 PM

views 54

बीड ते अहिल्यानगर रेल्वेसेवेचं तसंच अंमळनेर ते बीड रेल्वेमार्गाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाच्या अंमळनेर ते बीड या टप्प्याचं उद्घाटन आणि बीड ते अहिल्यानगर रेल्वेसेवेचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाला. या मार्गाच्या विद्युतीकरणाचं काम पुढच्या ३ ते ४ महिन्यांत पूर्ण होईल, असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिलं.   ही गाडी रेल्वेच्या इंजिनावर धावेल तेव्हा वेग वाढेल आणि प्रवासाचे तासही कमी होतील, असं फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार बजरंग सोनावणे, रजनी पाटील, आमदार पंकजा मुंडे, धनंजय मुंडे...

September 12, 2025 10:05 AM

views 97

राज्यात एक लाख ९ हजार कोटींचे उद्योजकता गुंतवणूक करार झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

महाराष्ट्र हे देशातील एक उद्योगस्नेही राज्य असून उद्योग आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आहे. नुकतेच राज्यात एक लाख नऊ हजार कोटींचे उद्योजकता गुंतवणूक करार करण्यात आले असून त्यातून 47 हजार तरुणांना रोजगार मिळणार आहेत', अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईमध्ये दिली. इंडिया-ऑस्ट्रेलिया बिझनेस अँड कम्युनिटी अलायन्स ग्लोबल फोरम लिडर्स मीट आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह झालेल्या गोलमेज परिषदेनंतर ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले... गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राने जी आघाडी घेतली आहे. ती ...

September 11, 2025 6:49 PM

views 179

आपले सरकार वेबसाइटची सुधारित आवृत्ती २ ऑक्टोबरपासून सुरु करण्याचे आदेश – मुख्यमंत्री

आपले सरकार वेबसाइटची लोकाभिमुख, सुधारित आवृत्ती २ ऑक्टोबरपर्यंत सुरू करा. इतर विविध वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या शासनाच्या सेवा आणि योजना या वेबसाइटवर उपलब्ध करुन द्या, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत दिले. आतापर्यंत सेवा हक्क हमी कायद्यामध्ये सेवांचीच हमी दिली जात होती. यापुढे पात्रतेच्या निकषावर योजनांच्या लाभाची हमीही नागरिकांना देण्यात यावी, असंही त्यांनी सांगितलं.    राज्य सरकारनं आज तब्बल १ लाख ८ हजार कोटीं रुपयांहून अधिक रकमेच्या गुंतवणुकीचे सामंजस्य...

September 8, 2025 3:39 PM

views 119

रामोशी-बेरड-बेडर समाजासाठी कर्ज योजना आणल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

राज्यातल्या रामोशी-बेरड-बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळा’च्या माध्यमातून राज्य शासनाने कर्ज योजना आणल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली.   ते काल आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या २३४व्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातल्या भिवडी इथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. रामोशी-बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पोलीस भरतीसाठी विशेष योजना, तसेच शिक्षण आणि प्रशिक्षणाकरता महाज्योती आणि सारथीमार्फत योजन...

August 23, 2025 6:16 PM

views 60

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला स्वावलंबनाचे मार्ग शोधत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या महिला स्वावलंबनाचे नवे मार्ग शोधत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या महिलांनी मुख्यमंत्र्यांसाठी रक्षाबंधनानिमित्त राख्या पाठवल्या, त्यानिमित्त मुंबईत कार्यक्रमत आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. महिलांच्या सहभागाशिवाय विकास शक्य नाही, त्यामुळे महिलांना सक्षम करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

August 21, 2025 3:15 PM

views 85

राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई शहरातल्या वाढत्या वाहतूक कोंडींच्या समस्येवर उपाययोजना सुचवण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची भेट घेतली. शहराच्या मूळ समस्येकडे दुर्लक्ष करुन कबुतरे, हत्ती या विषयांकडे अधिक लक्ष देण्याबाबत त्यांनी टीका केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचं त्यांनी राज ठाकरे यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 

August 21, 2025 3:01 PM

views 58

अमेरिकेनं भारतावर लादलेल्या आयात शुल्काला अडचण न समजता इष्टापत्ती समजावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

अमेरिकेनं भारतावर लादलेल्या आयात शुल्काला अडचण न समजता  इष्टापत्ती समजावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत जागतिक आयात निर्यात धोरणाच्या अनुषंगानं केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत बोलत होते. व्यापार सुलभता धोरण सरकारनं आखलं असून त्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र वॉर रूम स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.      नवीन उद्योगांबरोबरच सध्या अस्तित्वात असलेल्या उद्योगांच्या विकासासाठी शासन सकारात्मक आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.  उद्य...

August 10, 2025 6:53 PM

views 56

आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढल्यामुळे नागरिकांनी सजग राहण्याचं आवाहन

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर, आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत असल्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारांकडे सजगपणे बघावं, सावध राहावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज नागपूरमध्ये केलं. आर्थिक फसवणुकीला बळी पडलेल्यांना सुमारे १० कोटी रुपये परत देण्याचा कार्यक्रम, तसंच नागपूर पोलिसांनी विकसित केलेल्या गरुडदृष्टी समाजमाध्यम निगराणी प्रकल्पाचं सादरीकरण फडनवीस यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते.    देशातली सर्वात उत्तम सायबर गुन्हेगारीविरोधी यंत्रणा महाराष्ट्राकडे आहे, याच...

August 10, 2025 3:29 PM

views 56

वंदे भारतमुळे वेळेची बचत होऊन विदर्भातल्या लोकांना पुण्याशी जोडलं जाईल – मुख्यमंत्री

देशात नागपूर-पुणे ही सर्वाधिक अंतराची वंदे भारत रेल्वे सुरु झाली असून त्यामुळे वेळेची मोठी बचत होऊन विदर्भातल्या लोकांना पुण्याशी जोडलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर अजनी पुणे या वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाप्रसंगी नागपूर रेल्वे स्थानकावर ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ज्या प्रवासाला आधी १६ ते १७ तास लागत होते ते अंतर आता  केवळ बारा तासात कापणं शक्य होणार असून त्यासाठी त्यांनी  प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्वि...