November 5, 2025 1:40 PM

views 56

छत्तीसगडमध्ये प्रवासी रेल्वेगाडी अपघातात ११ जणांचा मृत्यू

छत्तीसगडमध्ये बिलासपूर रेल्वे स्थानकाजवळ प्रवासी गाडी आणि मालगाडीच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ११वर गेली आहे. काल झालेल्या या दुर्घटनेत २० जण जखमी झाले आहेत. दरम्यान, दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना ५ लाख रुपये, तर जखमींना ५० लाख रुपये नुकसानभरपाई द्यायची घोषणा मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी केली.

November 5, 2025 12:50 PM

views 63

छत्तीसगडमधे प्रवासी रेल्वेगाडी अपघातात ११ मृत्यू, २० जण जखमी

छत्तीसगडमध्ये बिलासपूर रेल्वे स्थानकाजवळ प्रवासी ट्रेन आणि मालगाडीच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ११वर गेली आहे. काल झालेल्या या दुर्घटनेत २० जण जखमी झाले आहेत. दरम्यान, दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना ५ लाख रुपये, तर जखमींना ५० लाख रुपये नुकसानभरपाई द्यायची घोषणा मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी केली.

November 1, 2025 7:58 PM

views 103

छत्तीसगडमध्ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी छत्तीसगढच्या दौऱ्यावर असून ते राज्यस्थापनादिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. प्रधानमंत्र्यांच्या  हस्ते छत्तीसगडमध्ये १४ हजार २६० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आज झाली. नवा रायपूर अटलनगर इथं छत्तीसगड विधानसभेच्या नव्या  इमारतीचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. हरित इमारत संकल्पनेवर बांधलेली ही रचना सौरऊर्जेवर चालण्यासाठी तयार केली असून त्यात पावसाचं पाणी साठवण्याच्या व्यवस्थेचा समावेश आहे. माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ...

October 17, 2025 12:38 PM

views 60

छत्तीसगडमध्ये २०८ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगडमध्ये आज २०८ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. त्यामुळं जवळपास संपूर्ण अबूजमाड आता नक्षलवाद्यांच्या प्रभावातून मुक्त झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये ११० महिला आणि ९८ पुरुष आहे. त्यांनी  १९ एके ४७ रायफली आणि १७ SLR रायफलींसह एकूण १५३ शस्त्र पोलिसांकडे जमा केली. 

October 12, 2025 10:49 AM

views 70

छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात ६ माओवाद्यांना अटक

छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी शुक्रवारी सहा माओवाद्यांना अटक केली आणि मंगनार रस्त्याजवळ लावलेली स्फोटकं निकामी कऱण्यात यश मिळवले. संशयास्पद व्यक्तींबाबत मिळालेल्या माहितीनंतर बारसूर पोलिस स्टेशन, जिल्हा राखीव रक्षक, केंद्रीय राखीव पोलिस दल यांच्या संयुक्त पथकानं ही कारवाई केली.

October 8, 2025 7:48 PM

views 74

छत्तीसगढमध्ये १६ माओवादी शरण

छत्तीसगढच्या नारायणपूर जिल्ह्यात आज १६ माओवाद्यांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली. यात  ७ महिलांचा समावेश आहे. शरणागत माओवाद्यांवर एकत्रितपणे सुमारे ३८ लाखांचं बक्षीस सरकारनं ठेवलं  होतं. राज्य सरकारच्या पुनर्वसन योजनेअंतर्गत यापैकी प्रत्येकाला ५० हजार रुपयांचा धनादेशदेण्यात आला. गेल्या २० महिन्यात १८ शे माओवाद्यांनी शरणागती पत्करली आहे.

September 23, 2025 9:20 AM

views 73

छत्तीसगडमध्ये दोन माओवादी ठार

छत्तीसगडमध्ये, नारायणपूर जिल्ह्यात काल सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले. दोघांवरही प्रत्येकी चाळीस लाख रुपयांचे बक्षीस होते. सुरक्षा दलांनी माओवाद्यांविरोधात केलेली ही कारवाई हा मोठा विजय असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.

July 18, 2025 8:22 PM

views 52

छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ६ माओवादी ठार

छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत ६ माओवादी ठार झाले आहेत. सुरक्षादलांनी त्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात रायफली जप्त केल्या आहेत. अबुझमाड भागात दुपारी ही चकमक झाली. अजूनही काही माओवादी त्या भागात लपलेले असल्याचा संशय असून त्यांचा शोध सुरु आहे.   

July 11, 2025 8:24 PM

views 64

छत्तीसगडमधे २२ माओवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण

छत्तीसगडमधल्या नारायणपूर जिल्ह्यात आज २२ माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. या सर्वांवर मिळून सुमारे साडे सदतीस लाखाचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रॉबिन्सन गुरिया यांनी दिली.   आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये मदतीच्या रूपात देण्यात आले. याशिवाय त्यांच्या पुनर्वसनासाठी इतर सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

June 6, 2025 3:18 PM

views 59

छत्तीसगडमध्ये चकमकीत नक्षलवादी नेता ठार

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांबरोबर काल झालेल्या एका चकमकीत सुधाकर उर्फ नरसिंह चालम उर्फ गौतम हा नक्षलवादी नेता मारला गेला. त्याच्यावर १ कोटी रुपयांचं बक्षीस होतं. तसंच गेल्या तीन दशकांपासून तो महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रिय होता, असं छत्तीसगढच्या पोलिस महासंचालकांनी सांगितलं.