July 31, 2026 5:28 PM
16
भिवंडी इथं इमारत कोसळून ९ जणांचा मृत्यू
ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही चार मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असून त्यांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत मृत्यु...