January 2, 2025 8:36 PM

views 69

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास बीड जिल्ह्याबाहेर सोपवण्याची विरोधी पक्षांची मागणी

मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास बीड जिल्ह्याबाहेरच्या यंत्रणेकडे सोपवावा, अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रकरणात पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप दिसून येत असल्याची टीका त्यांनी केली.

December 31, 2024 3:26 PM

views 71

मस्साजोग सरपंच हत्याप्रकरणी फरार वाल्मिक कराड पोलिसांना शरण

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड हे आज पुण्यातल्या सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले. शरण येण्यापूर्वी त्यांनी स्वतःचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून यात त्यांनी स्वत:वरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्यावर राजकीय द्वेषापोटी आरोप करण्यात आले असून चौकशीअंती आपण दोषी आढळलो तर शिक्षा भोगण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  [video width="848" height="480" mp4="https://www.newsonair.gov.in/wp-content/uploads/2024/12/Walmik-Karad.mp4"][/vid...

December 30, 2024 8:16 PM

views 61

बीड जिल्ह्यात १२ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत मनाई आदेश जारी

बीड जिल्ह्यातल्या विविध सामाजिक - राजकीय घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रशासनानं १२ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत.  मराठा, ओबीसी,धनगर समाजाचे आरक्षणासाठी सुरू असलेली आंदोलनं, मस्साजोग इथल्या सरपंचांच्या हत्या प्रकरणावरून सुरू असलेलं आंदोलन, आणि येऊ घातलेलं नववर्ष या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तणावाची स्थिती निर्माण होऊ नये, तसंच कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मनाई आदेश जारी केल्याचं जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी स्पष्ट केलं आहे.    दरम्यान...

December 27, 2024 10:45 AM

views 61

बीड जिल्ह्यात येत्या ३० आणि ३१ डिसेंबरला रेल्वेची जलदगती चाचणी

बीड जिल्ह्यात येत्या ३० आणि ३१ डिसेंबर रोजी विघनवाडी ते राजूरी या मार्गावरून रेल्वेची जलदगती चाचणी होणार आहे. या चाचणीदरम्यान रेल्वे मार्गाजवळ कोणीही येवू नये, असं आवाहन रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.   बीडपासून काही अंतरावर असलेल्या राजुरीपर्यंत या बहुप्रतिक्षित रेल्वे मार्गाचं काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे विघनवाडीपासून राजूरीपर्यंतच्या या नवीन लोहमार्गाची जलदगती चाचणी येत्या सोमवार-मंगळवारी होणार आहे. सकाळी दहा ते सा...

December 21, 2024 1:16 PM

views 426

नवनीत कावत बीडचे नवे पोलीस अधिक्षक

बीडच्या पोलीस अधिक्षक पदावर नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉवत सध्या छत्रपती संभाजीनगर येथे उपायुक्त असुन त्यांची एसपी म्हणून ही पहिलीच नियुक्ती आहे. ते २०१७ च्या बॅचचे आयपीएस आहेत. अविनाश बारगळ यांच्या बदलीची घोषणा काल सभागृहात करण्यात आली होती. त्यानंतर बीडला पोलीस अधिक्षक म्हणून कोण येणार याची सर्वांना उत्सुकता होती. या पदासाठी अनेक नावांची चर्चा असतानाच आता शासनाने नवनीत कावत यांची या पदावर नियुक्ती केली आहे. कावत मुळचे राजस्थानचे असुन २०१७ च्या बॅचचे आयपीएस आहेत. त्यांनी यापुर्...

December 20, 2024 2:44 PM

views 87

परभणी आणि बीड हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची घोषणा

बीड आणि परभणी इथं गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या प्रकरणी विरोधकांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते विधानसभेत उत्तर देत होते. परभणी इथं झालेली घटना कोणत्याही समुदायांमधल्या वैरभावनेतून झाली नाही. या प्रकरणात अटकेत असलेले सोमनाथ सूर्यवंशी यांना श्वसनाचा दुर्धर आजार होता, असंही त्यांनी नमूद केलं. सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली.   तसंच या घटनेनंतर मृत्यू झालेल...

December 16, 2024 3:06 PM

views 73

बीड हत्या प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बीडमधील सरपंच हत्या प्रकरण आणि परभणीमधील आंबेडकरी कार्यकर्त्याच्या कोठडीमधील मृत्यूप्रकरणविषयी मुद्दा उपस्थित केला. सरकारने याबाबत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.    त्यावर या संदर्भात चर्चा करू, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिलं.  बीडमधील हत्या प्रकरणी तीघांना अटक करण्यात आली असून जे सहभागी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. तसंच, हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण...

December 13, 2024 7:40 PM

views 70

बीडमध्ये शिक्षकाच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप

बीडमधले शिक्षक साजेद अली यांच्या खून प्रकरणात विशेष मोक्का न्यायालयाने १२ जणांना जन्मठेप सुनावली आहे. उर्वरित दोघांपैकी एकाला पाच वर्षांचा कारावास आणि पाच लाख रूपये दंडाची तर दुसऱ्याला सहा महिन्यांचा कारावास आणि पाचशे रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

December 13, 2024 7:42 PM

views 70

बीड जिल्ह्यात बंदला चांगला प्रतिसाद

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या मसाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी निषेध नोंदवण्यासाठी सकल मराठा समाजानं आज बीड जिल्हा बंदची हाक दिली होती. बीड शहरासह जिल्ह्यात इतरत्रही व्यापारी-दुकानदारांसह नागरिकांनी या बंदला प्रतिसाद दिला. या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवला असून राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन कंपन्या तैनात केल्या आहेत. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे.

December 12, 2024 10:52 AM

views 54

बीड जिल्ह्यात वाढती गुंडगिरी आणि अपहरणाच्या घटनांची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी – बजरंग सोनवणे

बीड जिल्ह्यात वाढती गुंडगिरी आणि अपहरणाच्या घटनांची केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सोनवणे यांनी भेट घेऊन ही मागणी केली. याविषयावर तातडीने ठोस पावलं उचलण्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिल्याचं खासदार सोनवणे यांनी सांगितलं.