January 22, 2026 3:11 PM

views 107

बीड जिल्ह्यात खरीप हंगाम तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासकीय हमीभाव केंद्रावर नोंदणी प्रक्रियेला सुरूवात

बीड जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५-२६ मधील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासकीय हमीभाव केंद्रावर नोंदणी प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. २० फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करता येणार आहे. केंद्र सरकारने यावर्षी तुरीसाठी ८हजार रुपये प्रति क्विंटल असा आधार भाव जाहीर केला आहे. खुल्या बाजारातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. बीड, परळी, अंबाजोगाई आणि गेवराई यांसारख्या प्रमुख केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

October 22, 2025 3:07 PM

views 101

बीडमध्ये ५० हजार घरकुले विक्रमी वेळेत पूर्ण

ऐन दिवाळीत बीड जिल्ह्यात प्रधानमंत्री घरकुल आवास योजने अंतर्गत ५० हजार घरकुले राज्य सरकारच्या वतीने विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आली. त्यामुळं बीड वासियांची दिवाळी नवीन घरकुलात साजरी होणार आहे. या योजनेसाठी शासनाकडून ९९० कोटीं रूपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाभार्थ्यांचे आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केलं आहे.

October 2, 2025 6:10 PM

views 194

बीड जिल्ह्यात सुरू झालेलं जातीपातीचं राजकारण संपवावं – पंकजा मुंडे

बीड जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू झालेलं जातीपातीचं राजकारण संपवावं असं आवाहन मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं. बीड जिल्ह्यातील सावरगाव इथं आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते. संत भगवान बाबा यांनी सर्व जातीपातीच्या लोकांना एकत्र राहण्याची शिकवण दिली, तसंच गोपीनाथ मुंडे यांनीही हाच वारसा पुढे नेला. त्यामुळे जिल्ह्यातील जातीपातीचं राजकारण थांबलं पाहिजे असं पंकजा मुंडे म्हणाल्या. ओबीसी प्रवर्गातल्या अनेक जाती आजही मागास आहेत, त्यामुळे ओबीसी आरक्षणात वाटा पडणं योग्य नाही. ...

September 15, 2025 7:43 PM

views 93

अहिल्यानगर-बीड-परळी-वैजनाथ या ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी १५० कोटी रुपयांचा निधी

बीड जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या अहिल्यानगर - बीड - परळी - वैजनाथ या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी शासनानं दिलेला अतिरिक्त १५० कोटी रुपयांचा निधी आज वितरित करण्यात आला. या प्रकल्पासाठी आजपर्यंत शासनानं २ हजार ९१ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. या योजनेच्या बीड-अहिल्यानगर या टप्प्यावरच्या रेल्वेसेवेचा प्रारंभ १७ सप्टेंबर रोजी, म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी होणार आहे.

September 10, 2025 4:04 PM

views 101

बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या २४ तारखेला होणार

बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या २४ तारखेला होणार आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज ही माहिती दिली.   या प्रकरणातला आरोप विष्णु चाटे याच्या दोषमुक्तीच्या अर्जावर आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी झाली, त्यानंतर निकम माध्यमांशी बोलत होते. या सुनावणीत न्यायालयानं दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून घेतले असून आपला आदेश राखून ठेवल्याचं निकम यांनी सांगितलं.

June 24, 2025 6:41 PM

views 95

संतोष देशमुख हत्याप्रकरणी पुढची सुनावणी ७ जुलैला

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज बीड इथल्या न्यायालयात सुनावणी झाली. वाल्मिक कराडचा संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभाग नाही असा युक्तीवाद त्याच्या वकिलाने न्यायालयात केला. त्याला विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी विरोध केला. न्यायालयाने आज दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकले, याप्रकरणी पुढची सुनावणी ७ जुलै रोजी होणार आहे.

June 11, 2025 3:30 PM

views 81

लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीला बीड जिल्ह्यात अटक

लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्या सात जणांच्या टोळीला बीड जिल्ह्यात अटक करण्यात आली आहे. आष्टी तालुक्यातल्या कारखेल बुद्रुक गावात एका तरुणाचं लग्न जुळवण्यासाठी काही लोकांनी पावणे सहा लाख रुपये घेतले होते. मात्र नवरी मुलगी लग्नानंतर तरुणाकडे राहायला येत नाही हे पाहून आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.   वडवणी इथल्या एका ऊसतोड कामगार तरुणाकडूनही या टोळीने लग्न जुळवण्यासाठी तीन लाख रुपये घेतले. मात्र नवरी मुलगी लग्नानंतर दोनच दिवसात पळून गेली. या प्रकरणी तपास केला ...

May 30, 2025 7:34 PM

views 100

सिन्दुर ऑपरेशन यशस्वी करून दाखवल्याबद्दल बीड शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन

भारतीय सैनिकांनी सिन्दुर ऑपरेशन यशस्वी करून दाखवल्याबद्दल  शौर्याला सलाम करण्यासाठी  रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बीड शहरात आज  भारत झिंदाबाद तिरंगा मोटार सायकल रॅली काढण्यात आली.  या रॅलीत महीला, रिपाइं पदाधिकारी  आणि  कार्यकर्ते हजारोच्या संखेने सामील झाले होते. 

April 22, 2025 6:44 PM

views 120

साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणी उपसभापती नीलम गोऱ्हेंची कांबळे कुटुंबीयांना भेट

बीड इथं साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कांबळे कुटुंबाची भेट घेतली.   या भेटीनंतर गोऱ्हे यांनी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाचा आढावा घेत सूचना केल्या. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांबरोबर घेतलेल्य बैठकीत छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजना करण्याच्या सूचना गोऱ्हे यांनी दिल्या.   त्यानुसार आता बीडमध्ये प्रत्येक महाविद्यालयात बडी कॉप कार्यरत केले जाणार असून यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थिनींना सहज तक्रार करता येणार आहे. 

April 19, 2025 4:03 PM

views 66

समुद्रातलं 53-TMC पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याचं काम सुरु होणार-मुख्यमंत्री

समुद्रात वाहून जाणारं त्रेपन्न टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याच्या योजनेला मान्यता दिली असून या वर्षाअखेर किंवा पुढल्या वर्षाच्या सुरुवातीला हे काम सुरू होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बीड जिल्ह्यातल्या घाटशील पारगाव इथं ‘नारळी सप्ताह’ सांगता  समारोहात ते आज बोलत होते. कृष्णा  कोयनेच्या पुराचं पाणी मराठवाड्यात आणण्याच्या योजनेलाही मंजुरी दिली असून पुढल्या महिन्यात याची निविदा काढली जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं. अहिल्यानगर आणि साेलापूर दाेन्ही बाजूने उजनी धरणातू...