महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेवरचे दोन न्यायिक सदस्य आणि दोन बिगर न्यायिक सदस्यांना आज लोकभवन इथं राज्यपाल ‘जिष्णु देव वर्मा’ यांनी पदाची शपथ दिली. सन २०२३ च्या नव्या लोकायुक्त कायद्यानुसार त्यांची नियुक्ती झाली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश सुरेंद्र तावडे, निवृत्त मुख्य जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी न्यायिक सदस्य पदाची तर सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव ओम प्रकाश गुप्ता आणि राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी न्यायिक सदस्यांव्यतिरिक्त अन्य सदस्य म्हणून शपथ घेतली. या सदस्यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी किंवा ते ७० वर्षांचे होईपर्यंत असेल.