August 14, 2026 9:21 PM

printer

सुखबीर सिंग बादल यांची प्रकृती स्थिर

नांदेड इथे अज्ञातानं  केलेल्या हल्ल्यात जखमी झालेले पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.

 

बादल यांच्यावर सुमारे दीड तास शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रकृती स्थिर असल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल आणि विमानानं  पंजाबला नेण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातल्या मातासाहेब गुरुद्वारा इथं काल एका व्यक्तीनं हा हल्ला केला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.