१५ ऑगस्टपासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांची एसटीच्या NCMC कार्डसाठी नोंदणी सुरू होणार

 राज्य परिवहन महामंडळाच्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातल्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्डाचं वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या शनिवारपासून नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होईल. प्रत्येक शाळेत जाऊन एसटीचे अधिकृत परवानाधारक प्रतिनिधी ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एनसी एमसी  कार्डसाठी इतर कोणत्याही ठिकाणी नोंदणी करू नये, असं आवाहन एसटी महामंडळानं केलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.