August 12, 2026 8:15 PM

printer

जपतलाई आश्रमशाळेत विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल

गडचिरोली, जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलई इथं अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याप्रकरणी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि दोन्ही वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच गेल्या वर्षभरात शाळेची तपासणी करणाऱ्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 

 

या पार्श्वभूमीवर नागपूर विभागीय आयुक्तालयाच्या कक्षेतल्या सर्व अनुदानित आश्रमशाळांची अचानक तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता, निवासी व्यवस्था आणि आवश्यक पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष स्थिती तपासली जाणार आहे.