August 12, 2026 9:08 PM

printer

टेबल टेनिस महासंघाची मान्यता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून रद्द

आवश्यक शर्तींची पूर्तता न केल्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं, टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यता आज स्थगित केली.  यापूर्वी महासंघाला पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीसला फेडरेशनने असमाधानकारक उत्तरे दिल्यामुळे, वेळेवर निवडणुका न घेतल्याने ही निलंबनाची कारवाई झाल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.  या महासंघाच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याची सूचना मंत्रालयानं भारतीय ऑलिम्पिक संघटनेला केली आहे.