August 11, 2026 8:16 PM

printer

वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अवमान करणं हा गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अवमान करणं हा गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज स्वाक्षरी केली. यामुळे जन गण मन या राष्ट्रगीताचाच दर्जा वंदे मातरम या गीतालाही मिळाल्याचं सरकारनं म्हटलं आहे. या नव्या कायद्यानुसार वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही ठोठावला जाऊ शकतो. तसंच वारंवार हाच गुन्हा करणाऱ्यांना प्रत्येक नव्या गुन्ह्यासाठी एका वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा देता येऊ शकते.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.