प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

केंद्रीय मंत्रीमंडळानं प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेला आज मंजुरी दिली आहे. यासाठी ५ हजार ७० कोटी रुपयाची तरतूद केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेला आणखी ५ वर्षांसाठीही केंद्र सरकारनं मुदतवाढ दिली आहे. यासाठी ३ लाख १५ हजार ६१४ कोटी रुपयांची तरतूद केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजूर केली. खेलो इंडिया योजनेचा विस्तार करायलाही मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे.