गेल्या ५ वर्षात राज्यातल्या ३६ हजाराहून अधिक कंपन्या बंद झाल्याचं लोकसभेतल्या एका उत्तरात स्पष्ट झालं होतं. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. बंद झालेल्यांपैकी ७६ टक्के कंपन्या कधीच सुरू झालेल्या नसतात.
एकत्रीकरणामुळं १२ टक्के तर विसर्जित झाल्यामुळं २ टक्के कंपन्या बंद झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. नव्या कंपन्यांच्या नोंदणीत दरवर्षी महाराष्ट्र पुढे असतो. गेल्या वर्षी राज्यातल्या साडे ४१ हजार नव्या कंपन्यांची नोंद झाली असंही ते म्हणाले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चाकण MIDC मधल्या समस्यांकडे लक्ष वेधले होते. या समस्या मान्य करत उद्योग मंत्री उदय सामंत यांना त्याकडे लक्ष द्यायला सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. याप्रकरणी परवाच संबंधित यंत्रणांची एक बैठक झाली असून समाधान काढण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन आराखडा निश्चित केल्याचं त्यांनी सांगितलं.