August 3, 2026 3:44 PM

printer

विद्यार्थी आंदोलनावरची कारवाई आणि राममंदिर अपहार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावं अशी विरोधी पक्षांची मागणी

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमार आणि पॅलेट गनच्या वापराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राम मंदिर देणगी अपहाराबाबत उत्तर द्यावं, अशीही मागणी त्यांनी केली. 

 

संसद भवन परिसरात आज इंडिया आघाडीच्या संसद सदस्यांची बैठक झाली. त्यानंतर खरगे यांनी समाज माध्यम संदेशाद्वारे ही मागणी केली. नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित कठोर पोलिस कारवाई आणि राम मंदिर देणगीच्या कथित अपहाराच्या मुद्द्यावर सरकारला संसदेत घेरण्याचा निर्धार इंडिया आघाडीनं  व्यक्त केला.