दक्षिण कोरियात आसान इथे सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या इशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत इशाराणी बरुआने दक्षिण कोरियाच्या ली सो हिचा १८-२१, २१-१५, ७-२१ असा पराभव केला. तर तन्वीने चीनच्या आन ची युआन हिच्यावर २१-१६, २१-१५ अशी मात केली. श्रियांशीने चिनी तैपेईच्या यू पो पाई हिचा २१-१५, २१-१४ असा सरळ गेममध्ये पराभव केला. महिला एकेरीत अनमोल खर्ब, मानसी सिंग, रक्षिता रामराज, अश्मिता चालिहा यांनीही पुढची फेरी गाठली. मात्र, आकर्षी कश्यपला कोरियाच्या मिन जी किमविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आणि ती स्पर्धेतून बाहेर पडली.
पुरुष एकेरीत, किदाम्बी श्रीकांत, तसेच मिथुन मंजुनाथ, किरण जॉर्ज, रौनक चौहान, सनीथ दयानंद आणि तरुण मन्नेपल्ली यांचा पहिल्याच फेरीत पराभव झाला. पुरुष दुहेरीत, कृष्ण प्रसाद गरग आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय या जोडीने थायलंडच्यी जोडीचा २१-१६, २१-१८ असा पराभव करून स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.