देशभरात ७ ऑगस्ट पर्यंत ९६७ लाख हेक्टर जमिनीवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती कृषी मंत्रालयाने दिली आहे. त्यात ३४४ लाख हेक्टर जमिनीवर भात आणि १८० लाख हेक्टर क्षेत्र तेलबियांखाली असून गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी हे क्षेत्र ५ लाख हेक्टरने वाढलं आहे. श्री अन्न अर्थात भरड धान्याखाली १६८ लाख हेक्टर जमीन असून १०६ हेक्टर क्षेत्रावर कापूस , तर १०३ लाख हेक्टर क्षेत्रात कडधान्यांची लागवड झाली आहे. उसाखाली ५८ लाख हेक्टर तर तागाची लागवड ६ लाख हेक्टर क्षेत्रात आहे.
News On AIR | August 11, 2026 7:40 PM
देशभरात ७ ऑगस्ट पर्यंत ९६७ लाख हेक्टर जमिनीवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण