August 12, 2026 8:51 PM

printer

भर्तीसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना

राज्यात विविध सेवाभरतींसाठी होणार्‍या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीने सुधारणांसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज घेतला. वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या समितीने राज्याच्या प्रत्येक विभागात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून सर्वंकष सुधारणांबाबत अहवाल सादर करेल. पुढच्या १५ दिवसांत पेपरफुटी आणि परीक्षांमधल्या गैरप्रकारांसंदर्भातल्या कायद्याची अंमलबजावणी राज्यात करावी, राज्यात किमान २५ हजार सुरक्षित क्लासरूम्स उभारण्यात याव्यात, असेही निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी या बैठकीत दिले.