August 14, 2026 9:22 PM

printer

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात तिरंगा रॅलीचं आयोजन

 स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात विविध जिल्ह्यांत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. 

भंडारा जिल्ह्यात हर घर तिरंगा अभियानांतर्गत आज भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी आणि नागरिक  मोठ्या संख्येने सहभागी झाले.   

सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून सांगली शहरात  सायकल आणि ई-बाईक रॅली काढण्यात आली. रत्नागिरीतही हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आज तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. या पदयात्रेत पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह विद्यार्थी, महिला आणि नागरिक सहभागी झाले होते.

 

यवतमाळमध्येही तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातात घेतलेला  अडीचशे फूट लांबीचा तिरंगा ध्वज या पदयात्रेचं आकर्षण ठरला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.