August 11, 2026 8:09 PM

printer

पुणे, धुळे, सांगली, परभणीत ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा रॅली

‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं.

 

काही दिव्यांग नागरिकही दुचाकींसह या यात्रेत सहभागी झाले होते. प्रत्येक नागरिकाने हातात तिरंगा घेतल्यावर देशाप्रती आपले कर्तव्य लक्षात ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केलं.

 

धुळे महानगरपालिकेनेही ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत आज शहरात बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅली मध्ये अग्निशमन दलाचे जवान विशेष बाईकसह सहभागी झाले होते. यावेळी विविध राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं.

 

सांगलीमध्येही हुतात्मा स्मारक ते शहीद स्मारक मार्गावर तिरंगा पद यात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत सुमारे ३०० फूट तिरंगा ध्वज हे रॅलीचं आकर्षण ठरलं.

 

परभणीतही आज तिरंगा सायकल-बाईक रॅली काढण्यात आली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.