वस्तू आणि सेवा कर संकलनात जुलै महिन्यात १५ पूर्णांक ४ शतांश टक्के भर पडली असून ते २ लाख११हजार कोटी रुपयांच्या वर पोहोचलं आहे. गेल्या वर्षीच्या जुलैमधे एकूण जीएसटी संकलन १ लाख ८३ हजार कोटी रुपये झालं होतं.
यंदाच्या संकलनात महिन्यात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर महसूल ३९ हजार ८३५ कोटी रुपये होता, तर राज्य वस्तू आणि सेवा करापोटी ४७ हजार ८८१ कोटी रुपये जमा झाले. एकात्मिक जीएसटी संकलन १ लाख २३ हजार कोटी रुपयांहून अधिक झालं.
जुलै महिन्यात एकूण परताव्याची रक्कम १३ पूर्णांक १ दशांश टक्क्यांनी वाढली, आणि २९ हजार ९६८ कोटी रुपये झाली. परताव्याची रक्कम वजा केल्यानंतर, निव्वळ जीएसटी महसूल १ लाख ८१हजार कोटी रुपयांच्या वर गेला.