पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज हल्ला झाला. नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातल्या मातासाहेब गुरुद्वारा इथं एका व्यक्तीनं हा हल्ला केला. त्यात जखमी झाल्यानं बादल यांना नांदेड शहरातल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खासदार हरसिम्रत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला आणि सुखबीर सिंग यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी बादल यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला, आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यांनी नांदेडच्या पोलिस अधिकक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली, आणि या हल्ल्यामागचा हेतू काय होता याचा तपास करण्याचे निर्देशही पोलिसांना दिले.
अकाल तख्ताचे जथेदार गियानी कुलदीपसिंग गर्गज्ज यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.