August 3, 2026 8:23 PM

printer

पालघरमधील अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकारची आर्थिक मदत जाहीर

जुलै महिन्यात पालघर जिल्ह्यातल्या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकानं आर्थिक मदत जाहीर केली आहे.  पूर्णपणे नष्ट झालेल्या घरांसाठी प्रत्येकी दीड लाख रुपये तर ५० टक्के नुकसान झालेल्या घरांना ५० हजार रुपये, २५ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या घरांना २५ हजार रुपये दिले जाणार आहे. पूर्णपणे नष्ट झालेल्या झोपड्यांनाही मदतीचा लाभ मिळणार आहे. पूरामुळे कपडे आणि घरातील अत्यावश्यक वस्तूंचे नुकसान झालेल्या कुटुंबांना कपड्यांसाठी दहा हजार रुपये आणि घरगुती साहित्याच्या नुकसानीसाठी आणखी दहा हजार रुपयांची मदत मिळणार आहे.  दुभत्या जनावरांच्या नुकसानीसाठी ४० हजार रुपये तर इतर जनावरांसाठी २० ते ३२ हजार रुपये मदत दिली जाईल. मासेमारीच्या बोटी आणि जाळ्यांच्या अंशतः किंवा पूर्ण नुकसानीसाठी मच्छिमारांना भरपाई दिली जाणार आहे. इतर व्यावसायिकांना प्रत्यक्ष नुकसानीच्या ७५ टक्क्यांपर्यंत आर्थिक मदत मिळेल.