August 14, 2026 8:37 PM

printer

आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज असणाऱ्या संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य-संरक्षणमंत्री

आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक-इन-इंडिया’ सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून,केंद्र सरकार आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज असणाऱ्या  संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आकाशवाणीवरून संरक्षण दलांना  संबोधित करताना ते बोलत होते. भारत आता केवळ आपल्या सुरक्षेच्या गरजा  पूर्ण करणारा देश नसून, जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र आणि संरक्षण सामग्रीचा निर्यातदार  म्हणूनही उदयास आला आहे, वर्ष २०१४ मध्ये केवळ ४६ हजार कोटी रुपये असलेले देशांतर्गत संरक्षण उत्पादन २०२५-२६ या आर्थिक वर्षात पावणे १ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.