August 3, 2026 4:03 PM

printer

ग्लासगोमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा दिमाखदार समारोप

२३व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सांगता स्कॉटलंडमधे  ग्लासगो काल एका दिमाखदार समारंभात  झाली. या स्पर्धेत १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि ९ कास्य अशा ३९पदकांसह भारतानं गुणतालिकेत चौथे स्थान पटकावलं आहे. २४ व्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतात होणार असून  यजमानपदासाठी ध्वज आणि बॅटन भारताच्या संघाकडे सोपवण्यात आला.  स्कॉटलंडच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धेचा ध्वज आणि बॅटन भारताचे प्रतिनिधी – ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पी. टी. उषा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे सुपूर्द केला. एकापेक्षा जास्त वेळा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमानपद भूषवणारा ऑस्ट्रेलियानंतरचा भारत हा दुसरा देश ठरणार आहे.