खेळ

August 18, 2025 9:58 AM

views 46

मलेशिया इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत देविका सिहागचा महिला एकेरीत विजय

भारताची बॅडमिंटनपटू देविका सिहागने मलेशिया इंटरनॅशनल चॅलेंज बँडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत विजेतेपदाला गवसणी घातली. तिने पाचव्या मानांकित इशाराणी बरुआ हिचा पराभव केला. ही स्पर्धा जागतिक बँडमिंटन फेडरेशनच्या प्रायोगिक 3×15 स्कोअरिंग फॉरमॅट अंतर्गत खेळवली जात आहे.

August 16, 2025 8:05 PM

views 46

अमेरिकेनं २०२६ मध्ये होणाऱ्या आयसीसी अंडर 19  विश्वचषकासाठीत स्थान

अमेरिकेत जॉर्जियातल्या रायडल इथं झालेल्या पात्रता फेरीमध्ये सर्वाधिक गुण मिळवतं अमेरिकेनं २०२६ मध्ये होणाऱ्या आयसीसी अंडर 19  विश्वचषकासाठी आपलं स्थान पक्क केलं आहे. अर्जुन महेशच्या नेतृत्वाखाली, अमेरिकेच्या संघानं पात्रता फेरीत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं. झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त ...

August 16, 2025 7:53 PM

views 41

भारत प्रथमच सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धेचं यजमानपद भूषवणार

भारत प्रथमच सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धेचं यजमानपद भूषवणार आहे. उत्तराखंडमधल्या देहरादून इथं येत्या २० ते २३ ऑगस्ट दरम्यान आशियाई खुल्या शॉर्ट ट्रॅक जलद स्केटिंग चषक स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे.  महाराणा प्रताप क्रीडा महाविद्यालयात होणाऱ्या या स्पर्धेत ११ हून अधिक आशियाई देश ...

August 16, 2025 7:53 PM

views 44

स्क्वॅशपटू अनाहत सिंहनं एनएसडब्ल्यू बेगा खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश

भारतीय स्क्वॅशपटू अनाहत सिंहनं ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या एनएसडब्ल्यू बेगा खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत तिनं इजिप्तच्या स्क्वॅशपटू नूर हिचा  ५४ मिनिटात ३-२ नं पराभव केला. अंतिम फेरीत तिचा सामना इजिप्तच्या हबीबा हिच्याशी होईल. हबीबानं उपांत्य फेरीत आकांक्षा साळुंखे हि...

August 16, 2025 7:51 PM

views 45

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू बॉब सिम्पसन यांचं निधन

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू बॉब सिम्पसन यांचं आज निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते.  अष्टपैलू क्रिकेटपटू असलेल्या  सिम्पसन यांनी ऑस्ट्रेलियाच्या संघाचं कर्णधारपद भूषवलं होतं. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या पुनरुज्जीवनात त्यांचं योगदान  महत्त्वपूर्ण मानलं जातं.  १९८० आणि १९९० च्या दशकात ऑस्ट्रेलियाच्या संघाच...

August 16, 2025 3:04 PM

views 36

अडथळ्यांच्या शर्यतीत अंकिता ध्यानीला सुवर्णपदक

ऑलिम्पिकपटू अंकिता ध्यानी हिनं जेरुसलेम ग्रँडस्लॅम ॲथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या २ हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावलं. ६ मिनिटं आणि १३ पूर्णांक ९३ शतांश सेकंद वेळ नोंदवून २३ वर्षांच्या अंकितानं याआधीचा पारुल चौधरीचा राष्ट्रीय विक्रमही मोडीत काढला. या यशामुळे पुढल्या महिन्यात टोकियो इथं...

August 14, 2025 8:22 PM

views 41

खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सवाचा लोगो आणि शुभंकर चिन्हाचं अनावरण

पहिल्यावहिल्या खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सवाचा लोगो आणि शुभंकरचिन्हाचं अनावरण आज श्रीनगर इथं झालं. हिमालयीन खंड्या हे या कार्यक्रमाचं शुभंकरचिन्ह असून याच्या लोगोमध्ये काश्मीरचं निसर्गसौंदर्य रेखाटण्यात आलं आहे. ही स्पर्धा श्रीनगरच्या दल लेक इथं २१ ते २३ ऑगस्टदरम्यान होणार आहे. यात ३६ राज्यं आणि कें...

August 14, 2025 1:39 PM

views 33

विख्यात हॉकीपटू वीसे पेस यांचं निधन

विख्यात हॉकीपटू वीसे पेस यांचं आज कोलकाता इथं वयाच्या ८०व्या वर्षी निधन झालं. प्रसिद्ध टेनिसपटू लिअँडर पेस यांचे ते वडील होते. गेल्या काही वर्षांपासून ते पार्किन्ससने आजारी होते आणि त्यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांची प्राणज्योत मालवली. १९७२च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये कांस्य...

August 13, 2025 8:18 PM

views 79

भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी आंतराष्ट्रीय फुटबॉलपटू खालिद जमील यांची नियुक्ती

भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी आंतराष्ट्रीय फुटबॉलपटू खालिद जमील यांची नियुक्ती झाली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने ही नियुक्ती जाहीर केली असून खालिद जमाल यांचा कार्यकाळ २ वर्षांचा असेल. जमील यांनी जमशेदपूर, नॉर्थ-ईस्ट युनायटेड, ईस्ट बंगाल, मोहन बगान आणि मुंबई अशा विविध फुटब...

August 13, 2025 2:42 PM

views 35

भारताच्या गुलवीर सिंगचा बिगर ऑलिम्पिक स्पर्धेत विश्वविक्रम

बुडापेस्ट इथं सुरू असलेल्या ग्युलई इस्तवान मेमोरियल हंगेरियन ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या गुलवीर सिंगने ३ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत पाचवं स्थान पटकावून बिगर ऑलिम्पिक स्पर्धेत विश्वविक्रम रचला. हे अंतर त्याने ७ मिनिटं ३४ सेकंद  ४९ मिनिसेकंदात पूर्ण केलं. गुलवीरची ही युरोपमधली ही पहिली ट्रॅक रेस ह...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.