खेळ

September 28, 2024 8:47 PM

views 42

सॅफ फुटबॉल चषक स्पर्धेत उपांत्य फेरीत भारताचा नेपाळवर ४-२ ने विजय

१७ वर्षाखालील सॅफ फुटबॉल चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतानं नेपाळला ४-२ असं पराभूत केलं. भूतानमधल्या थिंपू इथं हा सामना झाला. उपांत्य फेरीतल्या दुसऱ्या सामन्यात बांग्लादेशानं पाकिस्तानच्या संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये ८-७ असं पराभूत केलं. अंतिम सामन्यात सोमवारी भारताचा सामना बांग्लादेश सोबत होईल.

September 28, 2024 8:09 PM

views 46

मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपुष्टात

मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला दुहेरीत आज भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना उपांत्य फेरीत पराभव झाल्याने स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. त्रिसा आणि गायत्री या जोडीला चिनी तैपेईच्या हुंग-एन-त्झु आणि सिएह पेई शान जोडीकडून 21-17, 16-21, 21-10. असा पराभव स्विकारावा लागला. याआधी भारता...

September 28, 2024 2:37 PM

views 45

चीन खुल्या टेनिस पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा, इव्हान डोडिग यांचा सामना निकोलस जॅरी, फ्रान्सिस्को सेरंडोलो यांच्याशी होईल

चीन खुल्या टेनिस पुरुष दुहेरीत आज रोहण बोपण्णा आणि इवान डोडिग या भारत-क्रोएशिया जोडीचा सामना अर्जेंटिनाचा फ्रान्सिस्को सेरुंडोलो आणि चिलीचा निकोलस जेरी जोडीशी होणार आहे. बोपण्णाचा नियमित जोडीदार ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्डननं एटीपी फाईव्ह हंड्रेड प्रकारात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

September 28, 2024 2:22 PM

views 31

भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेला दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळं लांबणीवर

  भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळं लांबणीवर पडला आहे. कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात काल बांगलादेशच्या संघाने पहिल्या डावात ३ गड्यांच्या मोबदल्यात १०७ धावा केल्या होत्या. काल दिवसअखेर मोमीनुल हक ४०, तर मुशफिकूर रहीम ७ ध...

September 27, 2024 3:20 PM

views 75

मकाऊ ओपन बॅडमिंटन : त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडीची उपांत्य फेरीत धडक

मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडीनं महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या जोडीनं सु यिन हुई आणि वु लुओ या तैवानी जोडीचा २१-१२, २१-१७ असा सरळ गेममधे पराभव केला. या दोघीही उद्या उपांत्य सामन्यात सिह पेई शान आणि हंग एन झु या दुसऱ्या एका तैवानी जोडीश...

September 27, 2024 11:50 AM

views 41

भारत-बांगलादेशदरम्यान आजपासून कानपूर इथं दुसरा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना

भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना आजपासून कानपूर इथं खेळला जाणार आहे. सकाळी साडे नऊ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारत पहिली कसोटी जिंकत मालिकेत एक शुन्यनं आघाडीवर आहे. या सामन्यासाठी पहिल्या कसोटीचा संघ भारतानं कायम ठेवला आहे.

September 26, 2024 8:47 PM

views 41

मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदाम्बी श्रीकांतकडून भारताच्याच आयुष शेट्टीचा पराभव

मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारताच्या किदाम्बी श्रीकांतनं भारताच्याच आयुष शेट्टीचा २१-१३, २१-१८ असा पराभव केला. महिला दुहेरीत भारताच्या गायत्री गोपीचंद आणि त्रिसा जॉली या जोडीनं तैवानच्या लिन चिह-चुन आणि तेंग चुन-सुन यांचा २२-२०, २१-११ असा पराभव केला. महिला एकेरीत भारताच्या तस्निम ...

September 26, 2024 6:48 PM

views 71

खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत आज किदाम्बी श्रीकांतचा सामना आयुष शेट्टीशी होणार

मकाऊ इथं सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत आज दुपारी भारताच्या किदाम्बी श्रीकांतचा सामना भारताच्याच आयुष शेट्टीशी होणार आहे. तर महिला एकेरीत आज भारताच्या तस्निम मीरचा सामना जपानच्या तोमोका मियाकाझीशी होणार आहे. महिला दुहेरीत भारताच्या गायत्री गोपीचंद आणि त्रिसा जॉली या जोडीचा सा...

September 26, 2024 1:13 PM

views 34

जागतिक सिक्स रेड स्नूकर स्पर्धेत भारताच्या कमल चावलाला अजिंक्यपद

आंतरराष्ट्रीय बिलिअर्ड्स आणि स्नूकर महासंघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक सिक्स रेड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कमल चावला यानं अजिंक्यपद मिळवलं आहे. मंगोलियात उलानबातर इथं झालेल्या या स्पर्धेत कमल चावलानं पाकिस्तानच्या अस्जद इक्बालचा 6-2 असा पराभव केला. भारताचे मालकितसिंग, विद्या पिल्लई...

September 25, 2024 8:05 PM

views 56

क्रिकेट फलंदाजी मानांकनात भारताच्या दोन खेळाडूंना पहिल्या दहा खेळाडूत स्थान

कसोटी क्रिकेट फलंदाजी मानांकनात भारताच्या यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंत या दोघांनी पहिल्या दहा खेळाडूत स्थान मिळवलं आहे. ७५१ गुणांसह जयस्वालनं पाचवं तर पंतनं ७३१ गुणांसह सहावं स्थान पटकावलं आहे. चेन्नईत बांगलादेशाविरुद्धच्या सामन्यात भारताच्या विजयात या दोघांचा सिंहाचा वाटा होता. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.