प्रादेशिक बातम्या

September 21, 2025 9:23 AM

views 37

सातारा, सांगली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातल्या अतीवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईला मंजुरी

सातारा, सांगली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात जून ते ऑगस्ट दरम्यान अतीवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकंदर ६८९ कोटी रुपयांपेक्षा अधिक भरपाई देण्याला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी केल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

September 21, 2025 9:15 AM

views 69

कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो – मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीतून देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. इंडियन पोलीस फाऊंडेशनच्या १०व्या स्थापना दिनानिमित्त काल मुंबईत भारताच्या आर्थिक विकासासाठी पोलीस दलाची पुनर्कल्पना या विषयावरील चर्चासत्रात मुख्यमंत्री बोलत होते.

September 21, 2025 9:04 AM

views 37

शारदीय नवरात्रोत्सवासाठी राज्यातली शक्तीपीठं सज्ज

नवरात्र महोत्सवासाठी राज्यातील शक्तीपीठांची मंदिरं सज्ज झाली आहेत. उद्यापासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभतेनं दर्शन घेता यावं यासाठीची सर्व व्यवस्था देवस्थान समिती आणि महापालिकेनं केली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काल मंदिर परिसराला भेट...

September 20, 2025 8:24 PM

views 45

बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा २ वर्षात सुरू होणार असल्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा

महत्त्वाकांक्षी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचा सूरत ते बिलमोरा हा पहिला टप्पा २०२७ मध्ये सुरू होईल, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली. या बुलेट ट्रेन मार्गावरच्या घणसोली ते शीळफाटा यादरम्यानच्या बोगद्याचं जोडकाम वैष्णव यांच्या उपस्थितीत आज पूर्ण झालं, त्यावेळी ते वार्ताहरांशी बोलत ह...

September 20, 2025 3:38 PM

views 46

जागतिक किनारा स्वच्छता दिनानिमित्त मुंबईत स्वच्छता मोहीम

आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिन आणि सेवा पर्व २०२५ च्या निमित्ताने खासदार रविंद्र वायकर यांच्या उपस्थितीत मुंबईत जुहू आणि वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. जुहू चौपाटीवरच्या महात्मा गांधीच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन स्वच्छता मोहिमेची सुरुवात झाली. मोहिमेच्या वेळी उपस्थितांना स्व...

September 20, 2025 3:31 PM

views 58

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरणाच्या दहाव्या अखिल भारतीय परिषदेचं सरन्यायाधीशांच्या हस्ते उद्घाटन

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरणाच्या दहाव्या अखिल भारतीय परिषदेचं उद्घाटन आज नवी दिल्लीत झालं. शासकीय अधिकाऱ्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी न्यायाधीकरण महत्त्वाचं असल्याचं न्यायमूर्ती गवई यावेळी म्हणाले. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीक...

September 20, 2025 3:22 PM

views 78

जागतिक किनारा स्वच्छता दिनानिमित्त रत्नागिरीत स्वच्छता मोहीम

जागतिक किनारा स्वच्छता दिन आणि सेवा पर्व २०२५ या उपक्रमांतर्गत आज सकाळी रत्नागिरी तालुक्यातल्या भाट्ये समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. जिल्हा प्रशासन, विविध शाळांचे विद्यार्थी आणि विविध कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला.   प्लास्टिक पिशव्या टाळण्याचा संदेश देणाऱ्या क...

September 20, 2025 11:30 AM

views 90

कमी झालेल्या जीएसटीचा लाभ थेट शेतकऱ्यांना द्या – कृषी मंत्र्यांचे निर्देश

ट्रॅक्टर आणि शेतीसाठीच्या इतर साधनांवरच्या कमी केलेल्या जीएसटीचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे अशा सूचना केंद्रिय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिल्या.   शेतीच्या अवजारांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत काल नवी दिल्लीत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. दरकपातीचा फाय...

September 20, 2025 11:25 AM

views 20

भारताची जागतिक टपाल संघटनेच्या परिषदेत पुन्हा निवड

दुबई इथं झालेल्या 28 व्या जागतिक टपाल परिषदेदरम्यान भारताची जागतिक टपाल संघटनेच्या प्रशासन परिषदेत पुन्हा निवड झाली आहे. भारताची पुनर्निवड आंतरराष्ट्रीय समुदायाचा इंडिया पोस्टच्या नेतृत्वावर, सुधारणांवर आणि नाविन्यपूर्ण डिजिटल उपक्रमांवर असलेला विश्वास दर्शवणारी असल्याचं. दळणवळण मंत्रालयाने एका निवे...

September 20, 2025 10:52 AM

views 207

 मतदार यादीतून मतदारांची नावं परस्पर काढून टाकली जाऊ शकत नाही – निवडणूक आयोग

ऑनलाईन किंवा कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाकडून मतदार यादीतून मतदारांची नावं परस्पर काढून टाकली जाऊ शकत नसल्याचा केंद्रीय निवडणूक आयोगानं पुनरुच्चार केला आहे. कर्नाटकातल्या आळंद मतदारसंघात कुठल्याही मतदाराची नावं चुकीच्या पद्धतीनं काढू टाकली गेलेली नसल्याचंही आयोगानं म्हटलं आहे. मतदारांची नावं संशयास...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.