प्रादेशिक बातम्या

September 29, 2025 3:10 PM

views 97

अतिवृष्टीमुळं ४१ हजारांपेक्षा अधिक नागरिक स्थलांतरित

अतिवृष्टीमुळं राज्यातले ४१ हजारांपेक्षा अधिक नागरिक स्थलांतरित झाले आहेत, अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे. सर्वाधिक १३ हजारांहून अधिक नागरिक सोलापूरात स्थलांतरित झाले आहेत. तर जालन्यात साडे ८ हजार, छत्रपती संभाजीनगरमध्ये ८ हजारांहून अधिक आणि धाराशिवमध्ये सुमारे ४ हजार नागरिक स्थलांतरित झाले आहेत. ...

September 29, 2025 3:18 PM

views 50

अतिवृष्टीसारख्या परिस्थितीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीपैकी १० % निधी

जिल्हा नियोजन समितीच्या निधीपैकी १० टक्के निधी अतिवृष्टी, गारपीट किंवा पाणी टंचाई यासारख्या परिस्थितीसाठी वापरण्याची मुभा राज्य सरकारनं दिली आहे. यासंदर्भातला शासन आदेश नियोजन विभागानं आज जारी केला. हा निधी खर्च करण्यासाठी मंजुरी देण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना असतील आणि त्यानंतर होणाऱ्या जिल्हा निय...

September 29, 2025 3:17 PM

views 108

राज्यात विशेष अधिवेशन बोलावण्याची काँग्रेसची मागणी

राज्यात अतिवृष्टी, शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, त्यांना मिळणारी नुकसान भरपाई या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. अतिवृष...

September 29, 2025 3:16 PM

views 168

Maharashtra Flood : राज्यात पूरस्थिती कायम

राज्यात अनेक ठिकाणी पाऊस ओसरला असला तरी अद्याप पूरस्थिती कायम आहे. गोदावरी नदीला पूर आला आहे. जायकवाडी धरणातून तीन लाख क्युसेक्स इतका विसर्ग करण्यात आल्याने पैठण शहरात पाणी शिरलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जवळपास दहा हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. जायकवाडी धरणातून केलेल्या विसर...

September 29, 2025 3:20 PM

views 39

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर – नांदेड दोन विशेष रेल्वेगाड्या

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर - नांदेड दोन विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने घेतला आहे. पहिली विशेष गाडी नांदेड इथून एक ऑक्टोबर रोजी रात्री सव्वानऊ वाजता सुटेल, तर नागपूर इथं दुसऱ्या दिवशी म्हणजेच दोन तारखेला १२ वाजून दहा मिनिटाला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी तीन ...

September 28, 2025 7:44 PM

views 51

कोकण आणि मध्यमहाराष्ट्रात आजकरता जोरदार पावसाचा रेड अलर्ट

येत्या २ दिवसात राज्यात सर्वत्र बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण आणि मध्यमहाराष्ट्रात आजकरता जोरदार पावसाचा रेड अलर्ट तर उद्या ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.    

September 28, 2025 7:00 PM

views 145

राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम

राज्यात अनेक ठिकाणी आजही मुसळधार पाऊस होत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार होत असून कन्नड तालुक्यातल्या शिवना नदीला पूर आला आहे. अहिल्या नगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून विविध प्रकल्पांमधून मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे अनेक नद्यांन...

September 28, 2025 3:13 PM

views 462

ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचं आज लातूर इथं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. चंदनशिव हे धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातल्या हासेगावचे मूळ रहिवासी होते. ग्रामीण साहित्यात वेगळी कथा लिहून त्यांनी ग्रामीण स...

September 27, 2025 3:20 PM

views 32

4G मोबाईल सेवेसाठी राज्यात ९ हजार २० टॉवर उभारण्यात येणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरसंचार क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आणि सुमारे ३७ हजार कोटी रुपये खर्चाच्या ९७ हजार ५०० पेक्षा जास्त मोबाईल 4G टॉवर्सचं उद्घाटन दूरस्थ पद्धतीनं केलं. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पुण्यात करण्यात आलं, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. 4Gच्या म...

September 27, 2025 3:13 PM

views 67

राज्यात पुन्हा पावसाला जोर, उद्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट

राज्यात काल संध्याकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. अनेक ठिकाणी नद्यांचे प्रवाह फुगले असून धरणातल्या जलाशयांमधून विसर्ग करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे.त्याच्या बातम्या आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी दिल्या आहेत.  राजधानी मुंबई आणि परिसरात पावसाच्या जोरदार सर...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.