प्रादेशिक बातम्या

October 12, 2025 4:51 PM

views 356

राज्य शासनाचा खान अकॅडमीशी सामंजस्य करार

डॉक्टर जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम राबवण्यासाठी राज्य शासनाने खान अकॅडमीशी सामंजस्य करार केला आहे. याचा लाभ ५० लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे. या कार्यक्रमांतर्गत २०२५-२६ मध्ये राज्यातील सुमारे ६२ हजारांहून अधिक जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीसाठी खान...

October 12, 2025 4:42 PM

views 59

कायदेमंडळ, मंत्रिमंडळ आणि न्यायपालिका यांनी एकमेकांविरुद्ध काम करू नये, सरन्यायाधीशाचं प्रतिपादन

कायदेमंडळ, मंत्रिमंडळ आणि न्यायपालिका हे प्रशासनाचे तिन्ही स्तंभ देशाच्या नागरिकांना न्याय देण्यासाठीच काम करतात, त्यांचं अधिकारक्षेत्र स्वतंत्र असलं, तरी त्यांनी एकमेकांच्या विरोधात काम करू नये, असं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज केलं. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड इथं दिवाणी आणि ...

October 11, 2025 7:12 PM

views 81

राज्यातल्या ९ जिल्ह्यांसह देशातल्या १०० जिल्ह्यांमध्ये पीएम धनधान्य कृषी योजनेची सुरुवात

राज्यात पुणे इथं आयोजित कार्यक्रमात आज धनधान्य कृषी योजनेचा प्रारंभ कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झाला. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं जाईल, असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. कडधान्य हे आपल्या आहारातील प्रथिनाचं मुख्य साधन असून आपल्या देशात अजूनही कड...

October 11, 2025 8:07 PM

views 157

Maharashtra: जमीन मोजणीचा निपटारा आता ३० दिवसांत होणार

जमीन मोजणीचा निपटारा आता ३० दिवसांत होणार आहे. महसूल विभागानं यासाठी परवानाधारक खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून, राज्य सरकारनं यासंदर्भातील अधिसूचना जारी केल्याचं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. या निर्णयामुळे राज्यात प्रलंबित असलेली सुमारे तीन कोटी १२ लाख मोज...

October 11, 2025 7:38 PM

views 36

डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय कफ सिरपची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाई

अन्न आणि औषध प्रशासनाने डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय कफ सिरपची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय औषधे देणाऱ्या राज्यातल्या ८८ विक्रेत्यांना औषध विक्री बंदीचे आदेश देण्यात आले आहेत तर १०७ विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.   पुण्यात २० औष...

October 11, 2025 7:05 PM

views 76

महाराष्ट्र रणजी संघात बीडच्या सौरभ नवलेची यष्टिरक्षक म्हणून निवड

बीसीसीआयच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ नुकताच जाहीर झाला. महाराष्ट्र रणजी संघात बीडचा यष्टिरक्षक, फलंदाज आणि सातारा वॉरियर्सचा कर्णधार सौरभ नवलेची यष्टिरक्षक म्हणून  निवड झाली आहे. सौरभच्या निवडीबद्दल अनेक स्तरातले मान्यवर आणि क्रिकेटप्रेमींनी शुभेच्छा दिल्या आहेत. छत्रपती संभ...

October 11, 2025 7:03 PM

views 68

राज्य शासनाचं कृत्रिम बुद्धिमत्ता स्विकारण्याचं धोरण सुरू- मुख्यमंत्री

राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्ता स्विकारण्याचं धोरण सुरू केलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत वांद्रे इथं मेहबुब स्टुडिओत एचपी आणि इंटेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एचपी ड्रीम अनलॉक्ड’ या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. तंत्रज्ञान प्रत्येक भारती...

October 11, 2025 6:55 PM

views 65

बांबू लागवड ही केवळ शेती नसून टिकाऊ उपजीविकेचा मार्ग-पाशा पटेल

बांबू लागवड ही केवळ शेती नसून टिकाऊ उपजीविकेचा मार्ग आहे असं कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी म्हटलं आहे. ते आज वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात मनरेगा योजनेच्या सहाय्याने सुरू असलेल्या बांबू लागवड उपक्रमाच्या आढावा बैठकीत बोलत होते. बांबू लागवडीतून पर्यावरण संवर्धनाबरोबरच रोजगार निर्मिती आणि...

October 10, 2025 3:40 PM

views 68

म्हाडाच्या ५,३५४ सदनिका आणि ७७ भूखंड विक्रीसाठी उद्या संगणकीय सोडत

म्हाडाच्या कोकण विभागातून विविध गृहनिर्माण योजनेतून उभारलेल्या सदनिका तसंच काही भूखंड विक्रीसाठीची संगणकीय सोडत उद्या उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. ठाणे, वसई आणि पालघऱ जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या ५ हजार ३५४ सदनिका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ओरोस आणि कुळगा...

October 10, 2025 3:27 PM

views 99

नागपुरात ओबीसी संघटनांचा महामोर्चा

नागपूरात आज ओबीसी संघटनांनी महामोर्चा आयोजित केला होता. कुणबी जातीच्या व्यक्तींना ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भातला २ सप्टेंबरचा शासन आदेश रद्द करावा अशी त्यांची प्रमुख मागणी होती. मोठ्या संख्येने ओबीसी नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. नागपुरात यशवंत चौकातून सुरू झालेला मोर्चा संविधान चौकात ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.